पणजी, 21 जानेवारी: गोवा विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Assembly Election) भारतीय जनता पक्षाने (BJP) गुरुवारी 34 उमेदवारांची नावे जाहीर केली. विशेष म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar) यांचे पुत्र उत्पल (Utpal Parrikar) यांचे नाव या यादीत नाही आहे. मात्र भाजपकडून तिकीट न मिळाल्यानं आधीच नाराजी व्यक्त करणाऱ्या उत्पल यांना आणखी दोन जागांची ऑफर देण्यात आल्याचं वृत्त आहे.
दरम्यान असंही म्हटलं जात आहे की, पक्षाने 2027 मध्ये लॉन्चिंगशी संबंधित योजना देखील त्यांच्याशी शेअर केली आहे. उत्पल यांना त्यांच्या वडिलांच्या पणजी मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती.
NDTV च्या वृत्तानुसार, भाजपचे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले होते की, उत्पल यांना आणखी दोन पर्याय देण्यात आले आहेत. त्यांनी ते पर्याय स्वीकारावे असं आम्हाला वाटतं, असे ते म्हणाले.
घरात न सांगता व्हॅलेटाईन साजरा करण्यासाठी प्रेमी युगुल गोव्याला गेलं अन् परत आलेच नाहीत
आता गोव्यात 'काय हाटील, काय डोंगर'चं सत्र सुरू! काँग्रेस आमदारांना चेन्नईला हलवलं
गोव्यात पुन्हा एकदा धक्कादायक घटना, रिसॉर्टमध्ये डच महिलेसोबत भयंकर घडलं
गोव्यातील कर्ली क्लब पाडण्यास सुरुवात; याच क्लबमधील पार्टीनंतर झालेला सोनाली फोगटचा मृत्यू
मुंबईतून गोवा, कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी, लवकरच वाहतूक कोंडी संपणार
Goa Politics : काँग्रेस सोडलेले गोव्याचे 7 आमदार अमित शहांच्या भेटीला, मोठ गिफ्ट मिळणार?
संतापजनक! मुंबईत कोरियन मुलीच्या छेडछाडीनंतर गोव्यात विदेशी महिलेसोबत थेट..
पोटात गर्भ वाढत असताना पतीने थेट पत्नीवर घातल्या गोळ्या…, कारण ऐकून बसेल धक्का
Airplane Emergency Landing : गोवा-हैदराबाद विमानात अचानक धुराचे लोट; Emergency लँडिंग, धक्कादायक VIDEO
मुलीनं केली कमाल! मायक्रोसॉफ्टनं दिलं बंपर पॅकेज; 8-10 लाख नव्हे सॅलरीचा आकडा बघून व्हाल थक्क
Goa Tourism : गोवा फिरण्यासाठी जातायेत? 'या' ठिकाणी होईल मोफत राहण्याची सोय
मुंबई NCBची गोव्यात छापेमारी; एका विदेशी महिलेसह दोघींना अटक, 25 किलो गांजा जप्त
भाजपने पर्रिकर कुटुंबाला नेहमीच आदर दिला आहे, असंही फडणवीस यांनी म्हटलं. रिपोर्टमध्ये सूत्रांच्या माहितीनुसार असे म्हटले आहे की, पक्षाने उत्पल यांच्यासोबत एकाधिक पर्याय शेअर केले आहेत आणि त्यांना आश्वासन दिले आहे की ते हरले तरीही त्यांना संघटनेत स्थान दिलं जाईल. आम्ही त्यांच्यासोबत 2027 मध्ये चांगल्या लॉन्चसह 5 वर्षांची योजना शेअर केली आहे. त्यावर चर्चा सुरू आहे आणि आशा गमावलेली नाही, असंही सुत्रांनी सांगितलं आहे.
इतर पक्षांकडून तयारी सुरु
अलीकडेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उत्पल यांना आम आदमी पक्षाकडून लढण्याची ऑफर दिली आहे. गुरुवारी केजरीवाल यांनी ट्विट केलं की, गोव्यातील जनतेला फार वाईट वाटते की भाजपने पर्रिकर कुटुंबासह वापरा आणि फेकण्याचे धोरण स्वीकारलं आहे. मनोहर पर्रिकर यांचा मी नेहमीच आदर करतो. AAP मध्ये सामील होण्यासाठी आणि तिकिटावर लढण्यासाठी उत्पल जी यांचे स्वागत आहे.
Exclusive Video: घेराव घालत रस्त्यात थांबवली कार, हल्लेखोरांकडून 10 राऊंड फायरिंग
गेल्या आठवड्यात शिवसेना नेते संजय राऊत यांनीही विरोधी पक्षांना अपक्ष म्हणून उत्पल यांच्या लढ्याला पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते. अहवालात भाजपच्या सूत्रांचा हवाला देऊन म्हटले आहे की, आम्हाला आशा आहे की ते थोड्या फायद्यासाठी पक्षाची फसवणूक करणार नाहीत. पर्रिकर तुम्हाला भविष्य नाही. भाजप हे त्यांचे घर आहे. माजी केंद्रीय मंत्री दिवंगत पर्रिकर यांचे पणजी भागात 25 वर्षे वास्तव्य होते. बाबूश हे त्यांचे प्रतिस्पर्धी मानले जातात. पर्रिकर यांच्या निधनानंतर बाबूश यांनी काँग्रेसचे उमेदवार म्हणून पोटनिवडणूक जिंकली होती, पण नंतर ते भाजपमध्ये दाखल झाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.