मुंबई, 25 मे- ‘येऊ कशी तशी मी नांदायला’(Yeu Kashi Tashi Mi Nandayla) मालिकेत रोज नवनवीन ट्वीस्ट येत आहेत. स्वीटू आणि ओमच्या प्रेमात (Sweetu And Om Lovestory) रोज एक नवं वादळ उभं राहात आहे. या मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये ओम कायमचा लंडनला परत जायला निघाला आहे. तो घरी येऊन स्वीटूची माफीदेखील मागतो. मात्र आता स्वीटू ओमला जाण्यापासून थांबवणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. झी मराठीवर प्रक्षेपित होणारी,’येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका दिवसेंदिवस लोकप्रियता मिळवत आहे. यामध्ये स्वीटू आणि ओमची लव्हस्टोरी चाहत्यांना चांगलीच पसंत पडत आहे. दोघांमध्ये प्रेम असूनसुद्धा काही लोकांनी त्यांच्यामध्ये दरी निर्माण केली आहे. त्यामुळे स्वीटू स्वतःला ओमसमोर आपलं प्रेम व्यक्त करण्यापासून रोखते.
नुकताच या मालिकेचा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. यामध्ये ओम लंडनला जायला निघाला आहे. जाण्यापूर्वी त्याने घरी येऊन स्वीटूची माफी मागितली आहे. कारण त्याने स्वीटूच्या साखरपुड्यामध्ये सर्वांसमोर प्रेमाचा खुलासा करत. तिच्या साखरपुड्यात व्यत्यय आणला होता. (हे वाचा: चाहत्याचा सोनाली कुलकर्णीच्या पिंपरी चिंचवडमधील घरात राडा, वडील जखमी ) ओमला निघालेलं पाहून स्वीटूचा भाऊ तिला त्यांच्या प्रेमाची जाणीव करून देतो. आणि स्वीटू आपल्या प्रेमाला गमावत आहे हेसुद्धा सांगतो. आणि ओमला जाण्यापासून थांबवण्यास सांगतो. (हे वाचा: VIDEO: ‘भाऊ समजून माफ करा’, आदित्य नारायणने मागितली अलिबागकरांची माफी ) मात्र स्वीटू सर्व विचार बाजूला ठेऊन आपल्या प्रेमासाठी ओमला लंडनला जाण्यापासून थांबवेल का हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत. या मालिकेने अगदी कमी वेळेत मोठी लोकप्रियता मिळवली आहे. यामधील साधी सरळ मध्यमवर्गीय स्वीटू आणि हुशार श्रीमंत पण तितकाच समजदार, मायाळू ओमची लव्हस्टोरी चाहत्यांना भुरळ घालत आहे.