मुंबई 29 मे : झी मराठी (Zee Marathi) वरील लोकप्रिय मालिका ‘पाहिले न मी तुला’ (Pahila Na Mi Tula) मध्ये नवा ट्विस्ट येताना दिसत आहे. तर आता समर (Samar) प्रताप जहांगीरदारचं नव रुप प्रेक्षकांसमोर येत आहे. त्यामुळे समर पुन्हा काही कारस्थान तर करत नाही ना असाही प्रश्न निर्माण होत आहे. दरम्यान मालिकेत मनू (Manu) आणि अनिकेत (Aniket) आपल्या संसारात रमत आहेत. पण समरचे कटकारस्थानं सुरुच आहेत. तर आता समरचं नव रुप पहायला मिळत आहे. मनूला समरने लग्न केलं असेल का? व नसेल केलं तर का केलं नसेल? असे प्रश्न पडले आहेत. पण दुसरीकडे आता समरच्या इतर आयुष्याविषयी माहिती समोर येणार आहे.
म्हणून साकारली ‘राधे’त दगडू दादाची भूमिका; चाहत्यांच्या नाराजीवर तरडे यांचा मोठा खुलासा
नव्या प्रोमोत समर हा मोठा अधिकारी नसून एक वॉचमन असल्याचं दाखवलं आहे. व त्याची एक पत्नी देखिल आहे. व तो आपल्या पत्नीला भेटायला गेला आहे. व ती समरला पाहून फारच खूष होते. त्यामुळे प्रेक्षकही पुरते गोंधळून गेले आहेत. समर हा खरच वॉचमन आहे का? व त्याचं खरच लग्न झालं हे का? असे प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत.
त्यामुळे समरच्या पूर्वायुष्याविषयी समजल्यानंतर मनू नक्की काय करणार हे येणाऱ्या भागांमध्येच स्पष्ट होइल. पण समरने इतके दिवस त्याची ओळख का लपवून ठेवली. शिवाय तो एक वॉचमन ते मोठा अधिकारी कसा झाला हे देखिल एक न उलगडलेलं गुड आता प्रेक्षकांसमोर आहे. तेव्हा आता मालिकेत पुढे नक्की काय वळण येणार. मनू आणि अनिकेतच्या आयुष्यात काही विघ्न तर येणार नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. दरम्यान नुकतच मनू आणि अनिकेतने पुन्हा लग्न केलं आहे.