JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / अखेर डिम्पल अडकली पोलिसांच्या जाळ्यात; देवी सिंग विरोधात देणार साक्ष?

अखेर डिम्पल अडकली पोलिसांच्या जाळ्यात; देवी सिंग विरोधात देणार साक्ष?

पोलिस आणि वकील आर्या देशमुख यांना डिम्पलवर संशय आला आहे. त्यामुळे आता डिम्पलची पळता भूई झाली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 2 जुलै: झी मराठी (Zee Marathi) वरील नेहमीच चर्चेत राहणारी आणि तितकीच लोकप्रिय मालिका ‘देवमाणूस’मध्ये (Devmanus) फार मोठा ट्विस्ट आला आहे. मुख्य आरोपी देवी सिंगला (Devi Singh) आता आता एक जुळा भाऊ असल्याचं समोर आलं आहे . इतकचं नाही तर त्याने त्याचा खूनही केला आहे. पण दुसरीकडे आता डिम्पल (Dimple) पोलिसांच्या तावडीत अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण आता पोलिस आणि वकील आर्या देशमुख यांना डिम्पलवर संशय आला आहे. व तुला सगळं काही माहीत असल्याचं आर्या डिम्पलला म्हणतेय. त्यामुळे डिम्पलची आता पळता भुई झाली आहे.

दरम्यान मालिकेतील ट्विस्टने प्रेक्षकही चक्रावून गेले आहेत. देवी सिंग चा जन्म गरीब कुटुंबात झाला होता तर तर त्याला एक जुळा भाऊ देखील होता. पण त्याचा भाऊ फारच साधा असतो व त्याला एक चांगलं कुटुंब दत्तक घेत. तो डॉक्टर होतो त्याचं नाव अजितकुमार देव असतं. शिवाय जुळा असल्याने तो दिसायला हुबेहूब देवी सिंग सारखाच असतो अशी कथा त्याने डिम्पल ला सांगितली आहे.

संबंधित बातम्या

देवी सिंगने अजितचा ही खूण केला आहे. व त्याचे सर्व कागदपत्र स्वतःकडे ठेवले आहेत.  त्यामुळे आता कोर्टात देवी सिंग विरुद्ध पुरावे आर्या आणि दिव्या कसे सिद्ध करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

HBD: ‘टाईमपास’ची चंदा ते स्विटू; पाहा ठाण्याची अन्विता फलटणकर कशी झाली लोकप्रिय अभिनेत्री

आता डिम्पल खरच देवी सिंगच खरं रूप पोलिसांना आणि कोर्टाला सांगणार का की पुन्हा एकदा गुंगारा देणार हे ही पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या