JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / डॉक्टर अखेर डिम्पलसोबत करणार लग्न? ‘देवमाणूस’मध्ये सुरु झाली हळदीची तयारी

डॉक्टर अखेर डिम्पलसोबत करणार लग्न? ‘देवमाणूस’मध्ये सुरु झाली हळदीची तयारी

#Devmanus डॉक्टर -डिम्पलच्या लग्न सरू आजी होऊ देणार? दिव्याला सापडले आणखी नवे पुरावे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 22 मे : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील सर्वात जास्त चर्चेत राहणारी मालिका ‘देवमाणूस’ (Devmanus) मध्ये सध्या डिम्पल (Dimple) आणि डॉक्टर म्हणजेच देवी सिंगच्या (Devi singh) लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. तर आता त्यांचे लग्नाच्या आधी असलेल्या सगळ्या विधींनाही सुरूवात झाली आहे. लवकरच डॉक्टर आणि डिम्पलच्या हळदीचा कार्यक्रम रंगणार आहे. डॉक्टर आणि डिम्पल लग्नाच्या नाटकाने चौकशीपासून वाचण्याचा प्रयत्न करत आहेत. पण घरातील सगळेजन त्यांच्या लग्नासाठी फारच उत्सुक आहेत. याशिवाय गावातील लोकही डॉक्टरच्या लग्नासाठी फार आनंदी आहेत.

रिसॉर्टवरच हे लग्न होणार असून आता लग्नघटीका जवळ येत असल्याने मालिकेत लग्नमय वातावरण दिसत आहे. रिसॉर्टच्या डेकोरेशनची तयारी सुरू आहे. तर बाबू आणि मंगल आपल्या लाडक्या लेकीच्या पाठवणीसाठी सगळी तयारी यथोचित करत आहेत.

संबंधित बातम्या

दुसरीकडे एसीपी दिव्या सिंग तिचं कामात झोकून देऊन शोध घेत आहे. डॉक्टरविषयी तिच्या हाती अनेक पुरावे देखिल लागले आहेत. पण डॉक्टर असं काही करू शकतो यावर तिचा विश्वास बसत नाही. त्यासाठी ती आणखी कसून काम करत आहे. काही दिवसांपूर्वी डॉक्टर आणि पुराव्यांवरील हाताचे ठसे जुळले होते. त्यानंतर आता दिव्याला त्याच्यावर दाट संशय येत आहे. पण आणखी पुरावे मिळाल्याशिवाय ती डॉक्टरला काहीही कळू देणार नाही. अस तिने ठरवलं आहे.

‘प्यार का दिवाना’वर डान्स करणाऱ्या चिमुकल्यांना ओळखा पाहू? आज आहेत बॉलिवूड सुपरस्टार्स

तेव्हा आता मालिकेत डॉक्टर आणि डिम्पलचं लग्न जवळ येत आहे. सगळी तयारी देखिल झाली आहे. पण सरू आजी मात्र असजूनही लग्न होऊ देणार नाही यावर अडून आहे. त्यामुळे डिम्पल -डॉक्टरचं लग्न निर्विघ्न पार पडणार की डॉक्टरच्याच हातात बेड्या पडणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या