JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / लव्हस्टरी फेम कुमार गौरव का झाले बॉलिवूडमधून गायब? 21 वर्ष काय करतायेत

लव्हस्टरी फेम कुमार गौरव का झाले बॉलिवूडमधून गायब? 21 वर्ष काय करतायेत

गेली 20 वर्ष ते चित्रपटांपासून दूर आहेत. तर मग पाहूया बॉलिवूडचा हा चॉकलेट हिरो सध्या करतोय तरी काय?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 11 जुलै**:** कुमार गौरव (Kumar Gaurav) हे कधीकाळी बॉलिवूडमधील एक सुपरस्टार अभिनेते म्हणून ओळखले जायचे. हँडसम लुकसाठी प्रसिद्ध असलेल्या कुमार गौरव यांनी दिर्घकाळ सिनेसृष्टीत काम केलं नाही. लव्हस्टोरी, लव्हर्स, रोमान्स यांसारख्या काही मोजक्याच चित्रपटांमध्ये ते झळकले. (kumar gaurav movies) परंतु त्यांचे हे चित्रपट आज 40 वर्षानंतरही तितक्याच आवडीनं पाहिले जातात. यावरुन त्यांच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो. आज कुमार गौरव यांचा वाढदिवस आहे. (kumar gaurav birthday) 62 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. गेली 20 वर्ष ते चित्रपटांपासून दूर आहेत. तर मग पाहूया बॉलिवूडचा हा चॉकलेट हिरो सध्या करतोय तरी काय? ‘मी अभिनेता आहे पॉर्नस्टार नाही’; किसिंग सीनमुळे पारसचा वेब सीरिजला नकार कुमार गौरव हे प्रसिद्ध अभिनेते राजेंद्र कुमार यांचे पुत्र आहेत. त्यांनी देखील वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत अभिनयातच करिअर करण्याचा निर्णय घेतला होता. 1981 साली लव्हस्टोरी या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यांचा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला होता. अन् रातोरात कुमार गौरव बॉलिवूडचे अपकमिंग सुपरस्टार म्हणून चर्चेत आले होते. त्यानंतर तेरी कसम, लव्हर्स, रोमान्स, नाम यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं परंतु यापैकी अनेक चित्रपट फ्लॉप झाले. परिणामी त्यांच्यावर फ्लॉप अभिनेत्याचा शिक्का मारला गेला. ऐश्वर्याशी ब्रेकअप नंतर बदललं होतं विवेकचं आयुष्य; पत्नीला दिलं जीवन सावरल्याचं श्रेय निर्माते चित्रपट देईनासे झाले. त्यामुळे त्यांनी मग पुढे बॉलिवूडपासून दूर जात बिझनेसमध्ये आपलं नशीब आजमावून पाहिले. मालदिव येथे त्यांनी 7 स्टार हॉटेल्स आणि कसिनो सुरु केले. त्यामध्ये त्यांना खूप चांगलं यश मिळालं. त्यानंतर कंस्ट्रक्शन आणि आता टूर्स अँड ट्रॅव्हल क्षेत्रात ते व्यवसाय करत आहेत. बॉलिवूडमध्ये कुमार गौरव यांना म्हणावं तसं यश मिळालं नसलं तरी बिझनेसमध्ये मात्र ते सुपरस्टार म्हणूनच कार्यरत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या