मुंबई, 04 नोव्हेंबर- बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये त्यांनी रस्त्यावर राहणाऱ्या काही मुलांना पंचतारांकित हॉटेलमध्ये नेलं आणि त्यांना खाऊ घातलं. अनुपम यांचा हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यांच्या या कृतीचं सर्व स्थरांवरून कौतुक केलं जात आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी लिहिलं की, ‘मॉर्निंग वॉकला भेटणाऱ्या मुलांना नाश्त्याला घेऊन जाणं हे फार सुखकारक आहे. आम्ही एकत्र हसलो, गाणी गायली आणि जेवलो. मुलांसोबत चांगला वेळ घालवला. जेव्हा बिल आलं तेव्हा त्यांच्यातील एक हळूच पूटपूटला, काका बिल जास्त तर आलं नाही ना.. ही सर्व ती मुलं आहेत जे रस्त्यावर झोपतात. जय हो.’ अनुपम खेर यांनी ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला. मुलं अनुपम यांच्या गाडीतून उतरली आणि सन अँड सँड हॉटेलमध्ये गेली. हॉटेलची भव्यता पाहण्यात प्रत्येकजण व्यग्र होता हे व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतं. याशिवाय हॉटेलमध्ये जाताना त्यांच्यातली मस्ती अजिबातच कमी झालेली नाही हेही दिसतं. या व्हिडीओ सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. अनेकांनी अनुपम यांचं कौतुक जरी केलं असलं तरी काहींनी पुढील सिनेमासाठीचं प्रमोशन असल्याचंही म्हटलं.
अनुपम खेर यांच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर नुकताच त्यांचा द अॅक्सिडेन्टल प्राइम मिनिस्टर हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. यात त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची व्यक्तिरेखा साकारली होती. लवकरच ते हॉटेल मुंबई या हॉलिवूडपटात दिसणार आहे. यात त्यांनी मुंबईतील ताज हॉटेलमधील शेफ हेमंत ओबेरॉय ही व्यक्तिरेखा साकारली आहे. हॉटेल मुंबईमध्ये त्यांच्यासोबत हॉलिवूडस्टार देव पटेलचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. शाहिद कपूरच्या पावलांवर पाऊल ठेवत ही अभिनेत्री करणार Arrange Marriage प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचं WhatsApp अकाउंट झालं हॅक, हॅकर करतोय अश्लील व्हिडीओ Promo Video: जेव्हा गरिबीमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मुलाचा मृत्यू होतो दिल्लीच्या प्रदूषणावर प्रियांका चोप्राची रिअॅक्शन,‘इथं राहणं म्हणजे…’ Happy Birthday Tabu: तब्बू अजूनही आहे सिंगल, जाणून घ्या लग्न न करण्याचं कारण