मुंबई 28 मे**:** मिर्झापुर (Mirzapur) या वेब सीरिजमुळं नावारुपास आलेला विक्रांत मेस्सी (Vikrant Massey) हा सध्या बॉलिवूडमधील आघाडिच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्यानं मिर्झापुरमध्ये साकारलेली बबलू पंडित (Bablu Pandit) ही व्यक्तिरेखा तुफान गाजली होती. तेव्हापासून त्याला अनेक जण त्याच्या खऱ्या नावाऐवजी बबलू पंडित अशीच हाक मारतात. हाच बबलू आता अॅमेझॉन प्राईमनं केलेल्या एका चूकीमुळं चर्चेत आहे. त्यानं सोशल मीडियाद्वारे अॅमेझॉनची ही चुक त्यांच्या लक्षात आणून दिली. मात्र काही नवेटकऱ्यांनी ‘हे काम तुला नेटफ्लिक्सनं दिलं आहे का?’ असं विचारत त्याची उलट फिरकीच घेतली. अॅमेझॉन प्राईम या OTT प्लॅटफॉर्मवर अशा अनेक वेब सीरिज आहेत. ज्यावर कुठल्याही प्रकारचे सबटायटल त नाहीत. या पार्श्वभूमीवर सबटायटल देण्याची विनंती विक्रांतनं केली. “जर तुम्ही किमान विदेशी चित्रपटांसाठी तरी सबटायटल दिलेत तर तो व्हिडीओ पाहताना आणखी मजा येईल. तुमच्या या कृतीमुळं प्रेक्षकांना तो चित्रपट लवकर समजेल.” अशा आशयाचं ट्विट त्यानं केलं. त्याच्या या ट्विटची अॅमेझॉननं देखील लगेचच दखल घेतली. व त्यावर लवकरच काम सुरु होईल असं आश्वासन दिलं. ‘माझ्यासोबत झोप मी तुला काम देतो’; अभिनेत्रीनं सांगितला कास्टिंग काउचचा अनुभव
विक्रांत आणि अॅमेझॉनचे हे ट्विट्स सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. काही जणांनी विक्रांतची यासाठी स्तुती केली मात्र काही चणांनी त्याची खिल्ली देखील उडवली आहे. “तुम्हाला हा सल्ला देण्यासाठी नेटफ्लिक्सने सांगितलं आहे का ?” असे प्रश्न त्याला विचारले जात आहेत. एका दुसऱ्या युजरने लिहिलं, “मला नाही वाटत की त्यांना हे माहित असेल…ते या इतक्या महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करीत आहेत. यामागे काही विशेष कारण आहे का ?”