JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / प्रियांका चोप्राच्या न्यूयॉर्क रेस्टॉरंटमध्ये पोहोचले विकी-कतरिना, दाखवली स्पेशल डिशची झलक

प्रियांका चोप्राच्या न्यूयॉर्क रेस्टॉरंटमध्ये पोहोचले विकी-कतरिना, दाखवली स्पेशल डिशची झलक

कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशलने (Vicky Kaushal) गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यांनतर या दोघांनी लगेचच आपल्या कामाला सुरुवात केली होती. त्यामुळे त्यांना एकत्र व्हेकेशन एन्जॉय करता आलं नव्हतं. पण सध्या कतरिना कैफ आणि विकी कौशल यूएस ट्रिपवर (US Vacation) आहेत आणि ते एकत्र वेळ घालवत आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई,13 मे-  कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशलने   (Vicky Kaushal)  गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यांनतर या दोघांनी लगेचच आपल्या कामाला सुरुवात केली होती. त्यामुळे त्यांना एकत्र व्हेकेशन एन्जॉय करता आलं नव्हतं. पण सध्या कतरिना कैफ आणि विकी कौशल यूएस ट्रिपवर   (US Vacation)  आहेत आणि ते एकत्र वेळ घालवत आहेत. नुकतंच कतरिना पती विकीसोबत न्यूयॉर्कमधील तिच्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये गेली होती.या रेस्टॉरंटची मालकीण आहे अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra Restaurant Sona). होय, कतरिना इंडस्ट्रीतील मैत्रीण आणि अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या ‘सोना’ रेस्टॉरंटमध्ये गेली होती. कतरिनाने त्याठिकाणच्या एक फोटो तिच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केला आणि सोनाला ‘घरापासून दूर एक घर’ असं वर्णन केलं आहे. कतरिना आणि प्रियांका पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. यामध्ये आलिया भट्टसुद्धा असणार आहे. या तिघी फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’मध्ये झळकणार आहेत. या चित्रपटाची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे. हा एक रोड ट्रीपवर आधारित चित्रपट असणार आहे. कतरिना कैफचा सोनामधील हा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. कतरिना कैफने काही वेळेपूर्वी आपल्या इन्स्टा स्टोरीवर प्रियांका चोप्राच्या ‘सोना’ चे सह-मालक मनीष एम गोयलसोबत रेस्टॉरंटमधील स्वतःचा आणि विकीचा एक फोटो शेअर केला आहे. सोबतच कॅप्शन देत लिहिलंय, “घरापासून दूर एक घर. प्रियांका चोप्रा, नेहमीप्रमाणे, तू जे काही करतेस ते आश्चर्यकारक असतं.” कतरिनाने तिच्या कॅप्शनमध्ये हार्ट आणि स्मायली इमोजी शेअर करत तिच्यावर प्रेम व्यक्त केलं आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोमध्ये कतरिना कैफ फ्लोरल बेज ड्रेसमध्ये आणि विकी कौशल ब्लॅक कॅज्युअल आऊटफिट्समध्ये दिसत आहे. तसेच, विकीने आपल्या इन्स्टा स्टोरीवर आईस्क्रीम शेकचा एक फोटो देखील शेअर केला, जो त्याने प्रियंका चोप्राच्या रेस्टॉरंटमध्ये खाल्ला असावा. प्रियांकाने कतरिनाच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत लिहिलंय, “लव्ह यू हनी! तुम्ही लोक इथे आलात याचा खूप आनंद झाला. सोना नेहमीच तुमच्या स्वागतासाठी सज्ज आहे. हॅशटॅग घरापासून दूर एक घर.“सध्या दोन्ही अभिनेत्रींच्या पोस्ट प्रचंड चर्चेत आहेत. प्रियांका चोप्राने गेल्यावर्षी न्यूयॉर्कमध्ये ‘सोना’ची सुरुवात केली होती. यावेळी अभिनेत्रीने पारंपरिक भारतीय पद्धतीने पूजादेखील केली होती. तसेच याठिकाणी अनेक भारतीय पदार्थाची चव चाखायला मिळते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या