JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / HBD Urmila Matondkar: रंगीला गर्लने दिले अनेक हिट चित्रपट, पण तरीही लागला होता फिल्म करिअरला ब्रेक

HBD Urmila Matondkar: रंगीला गर्लने दिले अनेक हिट चित्रपट, पण तरीही लागला होता फिल्म करिअरला ब्रेक

उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar Birthday Special) 1990 च्या दशकातील सर्वात यशस्वी अभिनेत्री होती. तिने अनेक चांगल्या चित्रपटांमध्ये काम केलं. हिंदी चित्रपटांशिवाय उर्मिलाने तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि मराठी चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 04 फेब्रुवारी: उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar Birthday Special) 1990 च्या दशकातील सर्वात यशस्वी अभिनेत्री होती. तिने अनेक चांगल्या चित्रपटांमध्ये काम केलं. हिंदी चित्रपटांशिवाय उर्मिलाने तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि मराठी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. उर्मिला मातोंडकर आज (4 फेब्रुवारी 22) 48 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवसाच्या निमित्ताने सोशल मीडियावर फॅन्सकडून तिच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा (Happy Birthday Urmila Matondkar) वर्षाव होत आहे. उर्मिला मातोंडकरने वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आणि ती उत्तम डान्सरही आहे. काळानुसार तिने बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करणं कमी केलं आणि आपला मोर्चा राजकारणाकडे वळवला. पण उर्मिलाचं नाव सुरूवातीपासूनच अनेकदा वादात राहिलं. दिग्दर्शक रामगोपाल वर्मासोबत उर्मिलाच्या नात्यामुळेही ती अनेकदा चर्चेत राहिली. ‘रंगीला’ हिट झाल्यानंतर उर्मिला मातोंडकरने रामगोपाल वर्मासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. पण तिचे रामगोपाल वर्मासोबतचे बहुतेक सर्वच चित्रपट हिट ठरले. का झालं करिअरचं नुकसान? त्या काळच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, या नात्यामुळे तिच्या करिअरमध्ये अडथळे आहे. बॉलिवूडमध्ये अनेकांचं राम गोपाल वर्मासोबत भांडण होतं. ज्यामुळे कोणी उर्मिलासोबतही काम करण्यास तयार नव्हतं. अशातच जेव्हा रामगोपाल वर्मा आणि उर्मिलाचं ब्रेकअप झालं तेव्हा उर्मिलाकडे काहीच काम नव्हतं आणि त्यामुळे ती हळूहळू बॉलीवूडपासून दूर गेली. उर्मिला मातोंडकर आणि रामगोपाल वर्मा (Ram Gopal Verma and Urmila Matondkar) यांची लव्ह लाईफ खूपच वादग्रस्त होती. ज्यामुळे तिला वाईट परिणामही भोगावे लागले. हे वाचा- मधुबाला यांच्या बहिणीबद्दल समोर आली शॉकिंग न्यूज! सुनेनं घरातून बाहेर… कंगना-उर्मिलाचं महाभारत उर्मिला मातोंडकर आता राजकारणात उतरली आहे. आधी तिने काँग्रेस पार्टीत प्रवेश केला होता आणि नंतर शिवसेनेचा हात धरला. उर्मिलाने बॉलीवूडच्या ड्रग कनेक्शनबाबत एक मुलाखतीत म्हटलं होत की, संपूर्ण देश ड्रग्जच्या समस्येशी लढत आहे. कंगना रणौतला (Kangana Ranaut) माहित असलं पाहिजे की, तिचं गृह राज्य हिमाचल प्रदेश ड्रग्जचा बालेकिल्ला आहे. ती तिथूनच सुरूवात का नाही करत? यानंतर कंगनाने उर्मिलाविरूद्ध जोरदार टीका सत्रच सुरू केलं होतं. कंगनाने उर्मिलाला म्हटलं सॉफ्ट पॉर्न स्टार कंगना एवढ्यावरच थांबली नाही. एका युजरला उत्तर देताना कंगानाने लिहिलं होतं कि, तुझा महिलावाद कुठे होता, जेव्हा उर्मिलाने मला वेश्या म्हटलं होतं? याशिवाय उर्मिला अभिनयासाठी ओळखली जात नसून ती सॉफ्ट पॉर्न स्टार आहे. यानंतर कंगना आणि उर्मिला मातोंडकरबाबत सोशल मीडिया दोन गटात विभागल गेलं होतं. हे वाचा- रणविजयचा Rodies ला टाटा-बायबाय, हा बॉलिवूड अभिनेता करणार होस्ट! लग्नानंतरची काँट्रोव्हर्सी उर्मिलाने काश्मिरी उद्योगपती मोहसीन अख्तरशी लग्न केलं. जो तिच्यापेक्षा 9 वर्षांनी लहान आहे. उर्मिलाने धर्मपरिवर्तन करून लग्न केल्यानेही अनेक वाद झाले होते. उर्मिलाच्या लग्नात फक्त दोन्ही कुटुंब आणि काही मित्र सामील झाले होते. मोहसीन एक उद्योगपती असण्यासोबतच मॉडेलही आहे. तो ‘लक बाय चान्स’ या चित्रपटातही दिसला होता. उर्मिलाचं लग्न आणि धर्मपरिवर्तन यावरून तिचे कंगनासोबत वाद झाले आहेत. धर्मपरिवर्तनावरचा वाद उर्मिलाने तिचं नवं ऑफिस सुरू केल्यावर कंगनाने तिच्यावर निशाणा साधला. त्यावर उत्तर देताना उर्मिलाने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये शेवटी उर्मिलाने गणपती बाप्पा मोरया म्हटलं होतं. यावरून कंगनाने तिच्यावर निशाणा साधत म्हटलं कि, ‘चांगलं वाटलं की, तू मेहनतीने नवं ऑफिस घेतलंस. याबद्दल तुला खूप शुभेच्छा. पण ऐकलं आहे कि, तू निकाहसाठी धर्मपरिवर्तन केलंस. तरीही गर्वाने गणपतीचा जयजयकार केलास, हे पाहून चांगलं वाटलं. ऑल द बेस्ट.’ हे वाचा- जय-मीरानंतर आता बिग बॉसची ही स्पर्धक झळकणार उत्कर्ष शिंदेच्या गाण्यात यावर उर्मिला म्हणाली होती की, अशाप्रकारे माझा नवरा आणि माझ्या सासरच्यांवर टीका केल्याने माझं मनोबल कमी होणार नाही. कंगनाने माझ्या बोलण्याला योग्य म्हटलं की, खऱ्या मुद्द्यांवर बोलण्याची तिच्याकडे हिंमत नाही. तिने माझं खासगी आयुष्य, माझं लग्न आणि सासरच्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. खासगी आयुष्य आणि राजकारणामुळे उर्मिला कितीही चर्चेत राहिली तरी आजही तिचे चाहते कायम आहेत. जे तिच्या अभिनय आणि सौंदर्यावर फिदा आहेत. हॅपी बर्थ डे उर्मिला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या