JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / #UninstallHotstar का होतंय ट्विटरवर ट्रेंड? या सीरिजमुळे भडकले युजर्स

#UninstallHotstar का होतंय ट्विटरवर ट्रेंड? या सीरिजमुळे भडकले युजर्स

‘या’ वेब सीरिजमुळे अनेक युजर्सनी हॉटस्टार फोनमधून हटवण्यास (Why users are uninstalling Hotstar) सुरुवात केली आहे.

जाहिरात

Hotstar Webseries The Empire

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 ऑगस्ट: कोरोना काळात सिनेमागृह बंद असल्याने बहुतांश नागरिक मनोरंजनासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळले आहेत. या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात कंटेट प्रदर्शित झालेला आहे. मात्र अनेकदा या प्लॅटफॉर्मवर पब्लिश होणाऱ्या सीरिज किंवा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडतात. असाच काहीसा प्रसंग आज शुक्रवारी 27 ऑगस्ट रोजी डिझ्नी प्लस हॉटस्टार (Diesney+ Hotstar) वर प्रदर्शित झालेल्या एका सीरिजबाबत झाला आहे. या वेब सीरिजमुळे अनेक युजर्सनी हॉटस्टार फोनमधून हटवण्यास (Why users are uninstalling Hotstar) सुरुवात केली आहे. निखिल अडवाणी निर्मित या शोचं नाव आहे ‘The Empire’. यामध्ये तगडी स्टारकास्ट देखील आहे. तरी देखील या शो ला चाहत्यांचा रोश पत्करावा लागतो आहे. ट्विटरवर ट्रेंड होतंय #UninstallHotstar द एम्पायर ही सीरिज 27 ऑगस्टपासूव हॉटस्टारवर स्ट्रीम होत आहे. दरम्यान या सीरिजवरून मोठा वादंग निर्माण झाला आहे. ही सीरिज ‘एम्पायर ऑफ द मुगल - रेडर्स फ्रॉम द नॉर्थ’ यावर आधारीत आहे. मिताक्षरा कुमार दिग्दर्शित या सीरिजमध्ये शबाना आझमी, डिनो मोरिया, दृष्टि धामी, कुणाल कपूर, आदित्य सील, सहर बंबा, राहुल देव आणि इतर दिग्गज कलाकार आहेत. मात्र असं असूनही ही सीरिज वादाचं कारण ठरत आहे. अनेक युजर्सनी हॉटस्टार अनइस्टॉल करण्यास सुरुवात केली असून, ट्विटरवर तसे स्क्रीनशॉट देखील शेअर केले आहेत. शुक्रवारी सकाळपासू ट्विटरवर #UninstallHotstar ट्रेंड होत आहे. हे वाचा- ‘हेच ऐकायचं बाकी होतं…’, बलात्कार प्रकरणाबाबत कोर्टाच्या निर्णयावर भडकली तापसी या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला तेव्हापासूनच यासंदर्भात तक्रारी दाखल झाल्या होत्या. इंफर्मेशन टेक्नोलॉजी नियम 2021 च्या अंतर्गत हॉटस्टारच्या अधिकाऱ्यांकडे या तक्रारी दाखल झाल्या होत्या. या सीरिजमध्ये मुगल सम्राट असणाऱ्या बाबरचा गौरव करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती. या सीरिजबाबत नाराज असणाऱ्यांचं म्हणणं आहे की लाखो हिंदूंच्या कत्तली करणाऱ्या बाबरचा यात गौरव करण्यात आला आहे. मात्र हॉटस्टारने या तक्रारी फेटाळत त्यामध्ये आक्षेपार्ह किंवा विवादित काही नसल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र आज ही सीरिज प्रदर्शित झाल्यानंतर पुन्हा एकदा वाद उफाळला आहे आणि ट्विटरवर #UninstallHotstar ट्रेंड होत आहे. अनेक ट्विटर युजर्सनी शेअर केले हॉटस्टार अनइन्स्टॉल केल्याचे स्क्रीनशॉट ट्विटरवर अनेक युजर्सनी हॉटस्टार अनइन्स्टॉल केल्याचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. शिवाय हॉटस्टारविरोधात काही प्रतिक्रिया देखील सोशल मीडियावर उमटत आहेत. ‘जे प्रभू श्रीरामांचे होऊ शकले नाहीत, ते कुणाचेच नाहीत..’ अशाही प्रतिक्रिया युजर्सनी केल्या आहेत.

संबंधित बातम्या

हॉटस्टारची ही सीरिज प्रदर्शित झाल्यानंतर युजर्सनी मोठ्या प्रमाणात हॉटस्टार आणि या सीरिजवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

जाहिरात
जाहिरात

याआधी देखील तांडव, मिर्झापूर, सेक्रेड गेम्स इ. यासारख्या विविध सीरिज वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. आता द एम्पायर देखील या यादीमध्ये समाविष्ट झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या