मुंबई, 27 ऑगस्ट: छत्तीसगड उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाबाबत देशभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. कोर्टाच्या या निर्णयावर अनेकांनी टीका केली आहे. कायदेशीररित्या पत्नीच्या इच्छेविरोधात तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवणं म्हणजे बलात्कार नसल्याचं छत्तीसगड उच्च न्यायालयानं (Chhattisgarh High Court) म्हटलं आहे. कोर्टानं राज्यातील बेमेतरा जिल्ह्यातील एका प्रकरणावर सुनावणी करताना हा निर्णय दिला आहे. दरम्यान पत्नीचं वय 18 वर्षांपेक्षा कमी असू नये. या घटनेत महिलेनं आपल्या पतीवर बलात्कार आणि अनैसर्गिक पद्धतीनं संबंध ठेवल्याचा आरोप केला होता. पतीनं याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सोशल मीडियावर या निर्णयावर टीका केली जात आहे. अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu on Chhattisgarh High Court Marital Rape Verdict) हिने देखील या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. सामाजिक विषयांवर तापसीने अनेकदा तिची भूमिका मांडली आहे. कोर्टाचा हा निर्णय न पटल्याने तिने यावर देखील तिखट भूमिका मांडली आहे. तापसीने एक ट्वीट शेअर करत म्हटलं आहे की, ‘आता हेच ऐकायचं बाकी होतं..’
Bas ab yehi sunna baaki tha . https://t.co/K2ynAG5iP6
— taapsee pannu (@taapsee) August 26, 2021
याशिवाय तापसी पन्नू व्यतिरिक्त गायिका सोना मोहापात्रा (sona mohapatra) हिने देखील या निर्णयाशी असहमती दर्शवली आहे तिने देखील ट्वीट करत असं म्हटलं आहे की, ‘हे वाचल्यानंतर जो आजारीपण मला जाणवत आहे ते इथे लिहिण्यापलीकडील आहे.’
The sickness I feel reading this #India , is beyond anything I can write here. 🤢🤢🤢 https://t.co/uUm7l9bzxM
— Sona Mohapatra (@sonamohapatra) August 26, 2021
वकील वाय सी शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार छत्तीसगड उच्च न्यायालयाचे जस्टिस एन के चंद्रवंशी यांच्या बँचनं कायदेशीररित्या विवाहित पत्नीसोबत तिच्या इच्छेविरोधात किंवा बळजबरीनं संबंध ठेवणं म्हणजे बलात्कार नसल्याचं म्हटलं आहे. शर्मा यांनी सांगितलं, की या महिलेत आणि तिच्या पतीमध्ये काही कारणांवरून वाद सुरू होता. पत्नीनं ठाण्यात तक्रार दाखल केली होती, की त्यांचं जून 2017 मध्ये लग्न झालं आहे. हे वाचा- काळी जादू करत असल्याच्या संशयावरून शेजाऱ्याचा खून, बहीण आजारी पडल्याने केले वार लग्नानंतर काही दिवसातच तिच्या पतीनं आणि सासरकडच्या लोकांनी हुंड्याची मागणी करत तिचा छळ करण्यास सुरुवात केली. विवाहितेनं आरोप केला, की पती तिला शिवीगाळ करत मारहाणही करत असे. अनेकदा पतीनं तिच्या इच्छेविरोधात आणि अनैसर्गिकरित्या शारीरिक संबंधही ठेवले. वकीलांनी सांगितलं, की चौकशीनंतर महिलेचा पती आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक न्यायालयानं तक्रारीनंतर या व्यक्तींना आरोपीही ठरवलं होतं.