मुंबई, 26 मार्च: बिग बॉस 13 चा विजेता (Bigg Boss 13 Winner), अभिनेता आणि शहनाज गिलचा खास मित्र सिद्धार्थ शुक्ला (Shehnaaz Gill and Sidharth Shukla) याने 2 सप्टेंबर 2021 रोजी या जगाचा निरोप घेतला. सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर (Sidharth Shukla Death) शहनाज गिलचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले होते. सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर ही अभिनेत्री आजही सोशल मीडियापासून काहीशी दूर आहे. सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, अवघ्या 40 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर शहनाझ दीर्घकाळ एकाकीपणाशी लढत होती. दरम्यान शहनाझ सध्या या धक्क्यातून सावरत असून ती करिअरवर लक्ष्य केंद्रित करत आहे. शहनाझ आणि सिद्धार्थ ही बिग बॉसमधील सर्वांची आवडती जोडी होती. त्यांच्यातील निखळ मैत्री अनेकांना भावली होती. सिद्धार्थच्या जाण्याने कोलमडून गेलेल्या शहनाझला अनेक चाहत्यांनी धीर देण्याचा प्रयत्नही केला होता, पण काहींनी तिला एका घटनेनंतर ट्रोल देखील केले होते. हे वाचा- Lockupp: लॉकअपमध्ये ढसाढसा रडू लागला मुनव्वर फारूखी, नेमकं काय घडलं? सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर काही महिन्यांनी शहनाज गिल तिच्या मॅनेजरच्या एंगेजमेंटला गेली होती आणि इथे ती कश्मीरा शाह, विकास गुप्ता यांसारख्या स्टार्ससोबत पोज देताना दिसली. कश्मीरा शाहने या कार्यक्रमातील काही छायाचित्रे शेअर केली होती, ज्यामध्ये शहनाज हसताना दिसत होती. हा फोटो समोर आल्यानंतर शहनाज नेटिझन्सच्या निशाण्यावर आली. अनेकांनी सिद्धार्थच्या जाण्यानंतर अशाप्रकारे हसण्यावर प्रश्न उपस्थित केला होता. यावर आता पहिल्यांदाच शहनाज गिलने मौन सोडले आहे.
सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर झालेल्या ट्रोलिंगला उत्तर देताना शहनाज म्हणाली की, सिद्धार्थने तिला कधीही हसण्यास मनाई केली नाही. शिल्पा शेट्टीच्या ‘शेप ऑफ यू’ शोमध्ये (Shilpa Shetty Shape of You Show), शहनाज गिलने तिचा रुमर्ड बॉयफ्रेंड सिद्धार्थ शुक्लाबाबत सांगताना या ट्रोलिंगच्या घटनेबद्दल सांगितले, ज्याचे कारण तिचे हसणे होते. हे वाचा- इरफान खानच्या आठवणीत अमिताभ बच्चन भावुक, मुलगा बाबिलला लिहिलं पत्र यावेळी शहनाझ म्हणाली की, ‘मला हसण्याची संधी मिळाली तर मी हसेन. दिवाळी साजरी करायची इच्छा झाली तर मी करेन. कारण आयुष्यात आनंद खूप महत्त्वाचा आहे. मी स्वत: असं करण्याचा विचार करते. मी आज पहिल्यांदा या विषयावर बोलते आहे, ते पण तुम्ही प्रश्न विचारला आहे म्हणून. मी कधी याविषयी बोलत नाही, कुणीही विचारलं तरी.’
शहनाज पुढे असं म्हणाली की, ‘सिद्धार्थला नेहमी मला हसताना पाहायचं होतं. त्याने मला कधीही हसू नकोस असे सांगितले नाही. म्हणूनच मी नेहमी हसत राहीन, माझे काम करत राहीन. कारण मला आयुष्यात खूप दूर जायचे आहे.’ गेल्या बऱ्याच दिवसांपासून शहनाझच्या सोशल मीडिया पोस्ट आपण पाहिल्या तर त्या कामाशी संबंधितच आहेत. त्यामुळे सध्या तिने फक्त कामावरच लक्ष केंद्रित केले आहे हे निश्चित!