मुंबई, 26 मार्च- एकता कपूरचा 'लॉकअप'
(Lockupp) हा रिएलिटी शो दिवसेंदिवस रंजक बनत चालला आहे. शोमध्ये सतत राडे,मैत्री, प्रेम, तिरस्कार या गोष्टी पाहायला मिळत आहेत. यामध्ये काही स्पर्धक इमोशनल होतानासुद्धा दिसून आले आहेत. लॉकअप' च्या कालच्या भागात स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुखी
(Munawar Faruqui) ढसाढसा रडताना दिसून आला. यावेळी त्याला जेलर बनून आलेल्या बिग बॉस फेम करण कुंद्राने
(Karan Kundra) आधार दिला. पाहूया नेमकं काय घडलं.
'लॉकअप' या रिएलिटी शोची सध्या प्रचंड चर्चा आहे. कधी स्पर्धकांमुळे तर कधी होस्टमुळे हा शो चर्चेत असतो. या शोमध्ये होस्टच्या भूमिकेत पंगा क्वीन कंगना रणौत आहे. प्रत्येक आठवड्याला कंगना या कैद्यांची अर्थातच स्पर्धकांची उलट तपासणी करत असते. यामध्ये अनेक गुपिते समोर येतात. या शोमध्ये असे अनेक क्षण येतात जिथे अनेक स्पर्धक कमकुवत पडताना दिसतात.स्वतः ला शोमध्ये टिकवून ठेवण्यासाठी स्पर्धकांना अनेक अग्नीदिव्ये पार करावी लागतात.
दरम्यान नुकतंच झालेल्या एका एपिसोडमध्ये स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुखीला आपल्या भावना आवरणं कठीण झालं. शोमध्ये एक क्षण असा आला की, यावेळी मुनव्वर ढसाढसा रडू लागला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये बिग बॉस 15 फेम करण कुंद्रासुद्धा दिसून येत आहे.
करण कुंद्रा या शोमध्ये जेलर म्हणून आलेला आहे. यावेळी 'लॉकअप' मध्ये एक असा क्षण येतो जेव्हा मुनव्वर फारुखीला आपले अश्रू अनावर होतात. रडत असलेल्या मुनव्वरला पाहून करण कुंद्रा त्याच्याजवळ जातो आणि त्याला धीर देत म्हणतो, 'जेव्हा तू हसतोस तेव्हा संपूर्ण देश हसतो. आणि आज जेव्हा तू रडत आहेस आहेस तेव्हा संपूर्ण देश आणि मीसुद्धा रडत आहे... वेडा आहेस, रडू नकोस.'यावर मुनव्वर म्हणतो, 'हो भाऊ म्हणून तर मी कधी कुणासमोर रडत नाही'. पण मी माझ्या आईला वचन दिलं होतं'. असं म्हणत मुनव्वरने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आता नेमकं काय घडलंय? ज्यामुळे मुनव्वरला अश्रू अनावर झाले? हे येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.