JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / बोल्ड क्वीन निया शर्माला नऊ महिने मिळालं नव्हतं काम; असे काढले होते दिवस

बोल्ड क्वीन निया शर्माला नऊ महिने मिळालं नव्हतं काम; असे काढले होते दिवस

निया शर्माने स्टार प्लसवरील ‘एक हजारों मी मेरी बहना है’ या मालिकेतून आपल्या अभिनयाला सुरुवात केली होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, ११ सप्टेंबर-  निया शर्मा**(Nia Sharama)** हे नाव आज टीव्ही जगतात प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत गणलं जातं. आज नियाला प्रसिद्धी आणि पैसा दोन्ही भरभरून मिळत आहे. आज ती आपल्या करिअरमध्ये स्थिर झालेली दिसून येते. मात्र अनेक कलाकरांप्रमाणे निया शर्मालादेखील मोठा स्ट्रगल करावा लागला होता. नियानेसुद्धा करिअरच्या सुरुवातीला वाईट दिवस पाहिले आहेत. नुकताच एका शोमध्ये नियाने आपल्या स्ट्रग्लर्स डेजबद्दल मनमोकळे पणाने गप्पा मारल्या आहेत.

संबंधित बातम्या

निया शर्माने स्टार प्लसवरील ‘एक हजारों मी मेरी बहना है’ या मालिकेतून आपल्या अभिनयाला सुरुवात केली होती. यामध्ये तिने मानवी अशी व्यक्तिरेखा साकारली होती. जी मुख्य अभिनेत्रीची लहान बहीण असते. मात्र या मालिकेत नियाने आपल्या अभिनयाने सर्वांचं मन जिंकलं होता. मात्र तरीसुद्धा या शो नंतर नियाला अजिबात काम मिळालं नव्हतं. (हे वाचा: सीन दरम्यान गेला कार्तिक आर्यनचा आवाज; ‘भूल भुलैय्या 2’च्या सेटवर घडला प्रकार ) निया शर्मा नुकताच रेडिओ होस्ट सिद्धार्थ कननच्या शोमध्ये सहभागी झाली होती. सिद्धार्थला दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्या स्ट्रग्लर्स डेजचासुद्धा खुलासा केला. यावेळी बोलताना निया म्हणाली, ‘मी स्वतः च्या हिंमतीवर या इंडस्ट्रीमध्ये आले आहे. मी २०१३ मध्ये ‘एक हजारों मी मेरी बहना है’ हि मालिका केली. या मालिकेने मला ओळख दिली. (हे वाचा: सुखकर्ता, दुःखहर्ता…’ रितेशच्या मुलांनी गोड गळ्यात गायिली बाप्पाची आरती ) मात्र त्यांनतर ९ महिने माझ्याकडे कोणतंच काम नव्हतं. माझे कोणी मित्रही नव्हते. या काळात मी स्वतः वर काम केलं. या दरम्यान मी बेली डान्स शिकून घेतला. नऊ महिने उलटले तरी माझ्याकडे काही काम आलं नाही. मी या काळात काहीच पैसे मिळवले नाहीत. मी खूप कठीण काळातून गेलेय. मला परत हे आयुष्य जगायचं नव्हतं. त्यामुळे मी खूप मेहनत घेतली. आजही माझ्याकडे फिक्स असे काही शोज नाहीत. मात्र आज माझ्याकडे काम आहे. मी रोज पैसे मिळवते. त्यामुळे नियाला हे यश सहजासहजी मिळालं नाही असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या