नुकताच अभिनेता कार्तिक आर्यनने 'भूल भुलैय्या २'चा क्लायमॅक्स शूट केला आहे. यादरम्यान एक खूपच विचित्र प्रकार घडला.
अभिनेत्री तब्बू आणि कार्तिक आर्यन नुकताच या चित्रपटासाठी शूट करत होते. यामध्ये एका सीनमध्ये अतिशय ओरडाओरडी करायची होती.
मात्र सीनच्या शेवटी-शेवटी अचानक कार्तिकचा आवाजच गेला. या सर्व प्रकाराने सेटवर एकच खळबळ उडाली होती.
मात्र डॉक्टरांनी सांगितलं चिंतेची काही बाब नाहीय हे Laryngitis आहे. हे जास्त आरडा ओरडी केल्याने घशाला इन्फेक्शन होत. घशाला आराम दिल्यास सर्व ठीक होईल असं सांगण्यात आलं. त्यांनतर सर्वांनी सुटकेचा निश्वास घेतला.