JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / खान-कपूर नव्हे तर हा अभिनेता आहे 'गोल्डन बॉय'चा फेव्हरेट; अभिनेत्याने स्वत: शेअर केला VIDEO

खान-कपूर नव्हे तर हा अभिनेता आहे 'गोल्डन बॉय'चा फेव्हरेट; अभिनेत्याने स्वत: शेअर केला VIDEO

सध्या संपूर्ण देशभरात गोल्डन बॉय नीरज चोप्राचं कौतुक होत आहे. पण त्याला कोणता अभिनेता आवडतो माहित आहेका?

जाहिरात

नीरज चोप्रा संतापला

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 20 ऑगस्ट :  काही दिवसांपूर्वीच टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) स्पर्धा पार पडल्या आहेत. भारतीय खेळाडूंनी उत्तम कामगिरी करत देशाचं नाव मोठं केलं. रौप्य आणि कांस्य पदकांसह एक सुवर्ण पदक (Gold Medal)  देखील देशाच्या पारड्यात पडलं. पानिपतचा नीरज चोप्रा (Neeraj Chopra) भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकला. सध्या संपूर्ण देशभरात नीरजच कौतुक होत आहे. पण त्याला कोणता अभिनेता आवडतो माहित आहेका? नीरजने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याचा आवडता अभिनेता कोण आहे हे सांगितल आहे. तर त्याला अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hudda) हा अभिनेता फार अवडतों त्याचे अनेक चित्रपटही त्याने पाहिले आहेत. याशिवाय त्याची आवडती हरियानवी फिल्म देखील त्याने सांगितली. नीरज चा हा व्हिडिओ रणदीपने देखील त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.

दरम्यान रणदीपचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे वाढदिवसानिमित्त रणदीपला जणू ही भेटवस्तू मिळाली आहे. रणदीप चा जन्म 20 ऑगस्ट 1976 ला रोहतक हरियाणा मध्ये झाला होता. रणदीपला त्याच्या चित्रपटातील विशेष भुमिंकासाठी ओळखलं जातं.

2001 साली ‘मान्सून वेडिंग’ या चित्रपटातून त्याने आपल्या करियरची सुरुवात केली होती. कधी मुख्य तर कधी सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिका त्याने साकारल्या. हायवे, सरबजीत या चित्रपटांतील त्याच्या भूमिका विशेष हीट ठरल्या होत्या. रणदीपचे आई वडील हे डॉक्टर होते. त्यामुळे रणदीप ने देखील डॉक्टर व्हावं अशी त्यांची इच्छा होती. पण रणदीपने अभिनय क्षेत्र निवडल. हरियाणा तर नंतर मेलबर्न, ऑस्ट्रेलिया मध्ये त्याने आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं. लवकरच तो ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेब सीरिज मध्ये दिसणार आहे. याशिवाय ‘अनफेअर अँड लवली’ आणि ‘रॅट ऑन द हायवे’ या चित्रपटांतही दिसणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या