JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन /  ‘3 वर्ष काम शोधत होतो’; फॅमेली मॅनमधील जेके तळपदे कर्जबाजारीपणामुळं झाला होता बेजार

 ‘3 वर्ष काम शोधत होतो’; फॅमेली मॅनमधील जेके तळपदे कर्जबाजारीपणामुळं झाला होता बेजार

एक काळ असाही होता जेव्हा त्याच्या डोक्यावर कर्जाचं ओझं होतं. अन् तो देखील सीरिजमधील श्रीकांत तिवारी प्रमाणेच काम आणि कुटुंब यांच्यात समतोल राखण्याचा प्रयत्न करत होता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 26 जून**:** मनोज वाजपेयीची ‘द फॅमेली मॅन’ (The Family Man) ही वेब सीरिज सध्या प्रचंड चर्चेत आहे. कुटुंब आणि काम यांच्यामध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका स्पेशल एजंटचा प्रवास या सीरिजमध्ये दाखवण्यात आला आहे. जरदस्त पटकथा आणि मनोज वाजपेयीचं (Manoj Bajpayee) कॉमिक टायमिंग यामुळं ही सीरिज सुपरहिट झाली. परंतु या सीरिजमध्ये मनोजसोबतच अभिनेता शारीब हाश्मी (Sharib Hashmi) यानं देखील सर्वांचच लक्ष वेधून घेतलं. त्यानं अभिनयाच्या बाबतीत राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मनोज वाजपेयीला देखील टक्कर दिली. आज तो देखील यशाच्या शिखरावर आहे. पण एक काळ असाही होता जेव्हा त्याच्या डोक्यावर कर्जाचं ओझं होतं. अन् तो देखील सीरिजमधील श्रीकांत तिवारी प्रमाणेच काम आणि कुटुंब यांच्यात समतोल राखण्याचा प्रयत्न करत होता. ‘तू वेश्या व्यवसाय करतेस का?’ पॉर्नस्टार म्हणून ट्रोल करणाऱ्याला सोफिया हयातचं प्रत्युत्तर सकाळला दिलेल्या मुलाखतीत शरीबनं आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी त्यानं आयुष्यातील तो कठीण प्रसंग सांगितला. तो म्हणाला, “मी जवळपास 33 व्या वर्षी फूल टाईम अभिनेता होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी माझं लग्न झालं होतं. एक मुल होतं. पण मी माझी नोकरी सोडली आणि ऑडिशन देत फिरू लागलो. तीन वर्ष माझ्याकडे काहीही काम नव्हतं. केलेली बचत संपत आली होती. डोक्यावर कर्ज झालं होतं. मग पुन्हा एकदा नोकरी करायला सुरुवात केली. याच दरम्यान शानू शर्माचा मला फोन आला. त्यानं जब तक है जान या चित्रपटासाठी ऑडिशन द्यायला मला बोलावलं.” तरुणीनं Adult Website वर सुरु केले योगा क्लासेस; महिन्याला कमावते 73 लाख “या चित्रपटात मी सिलेक्ट झालो. खर तर या चित्रपटात मला लहानशी भूमिका मिळाली होती. पण ती त्या भूमिकेमुळं फिल्मीस्तानमध्ये काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटात मला मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. अन् तिथूनच खऱ्या अर्थानं करिअरला वेगळी दिशा प्राप्त झाली. मग पुढे अनेक चित्रपटात काम मिळत गेलं. डोक्यावरील कर्ज हळूहळू कमी झालं. फॅमिली मॅन ही सीरिज इतक्या वर्षांच्या मेहनतीचं फळ आहे असं वाटतं.” हा अनुभव सांगताना शारीब भावूक झाला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या