जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘तू वेश्या व्यवसाय करतेस का?’ पॉर्नस्टार म्हणून ट्रोल करणाऱ्याला सोफिया हयातचं प्रत्युत्तर

‘तू वेश्या व्यवसाय करतेस का?’ पॉर्नस्टार म्हणून ट्रोल करणाऱ्याला सोफिया हयातचं प्रत्युत्तर

‘तू वेश्या व्यवसाय करतेस का?’ पॉर्नस्टार म्हणून ट्रोल करणाऱ्याला सोफिया हयातचं प्रत्युत्तर

स्वस्तातली पॉर्नस्टार म्हणत एका नेटकऱ्यानं तिची खिल्ली उडवली शिवाय तिचे अभिनवसोबत शारिरिक संबंध होते असा दावा देखील त्यानं केला आहे. त्याच्या या दाव्यावर आता स्वत: सोफियानं व्हिडीओ शेअर करत प्रत्युत्तर दिलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 26 जून**:** अभिनेत्री सोफिया (Sofia Hayat) हयात सध्या बॉलिवूडमध्ये कार्यरत नाही. मात्र तरी देखील ती कुठल्या ना कुठल्या कारणामुळं सतत चर्चेत असते. कधी अश्लील फोटोंमुळं, कधी क्रिकेटपटूंसोबत असलेल्या रिलेशनशिपमुळं, तर कधी नन झाल्यामुळं. सध्या ती अभिनेता अभिनव शुक्लासोबत (Abhinav Shukla) असलेल्या नात्यामुळं चर्चेत आहे. स्वस्तातली पॉर्नस्टार म्हणत एका नेटकऱ्यानं तिची खिल्ली उडवली शिवाय तिचे अभिनवसोबत शारिरिक संबंध होते असा दावा देखील त्यानं केला आहे. त्याच्या या दाव्यावर आता स्वत: सोफियानं व्हिडीओ शेअर करत प्रत्युत्तर दिलं आहे.

जाहिरात

क्रेझी फॅनमुळे अभिनेत्री त्रस्त; ‘त्या’ कृतीसाठी पाठवलं थेट तुरुगांत काय म्हणाली सोफिया**?** सोफियानं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओद्वारे तिनं केल्या जाणाऱ्या आरोपांचं खंडन केलं आहे. ती म्हणाली, “मी अभिनवला ओळखत देखील नाही. त्यामुळं ‘वन नाईट स्टॅंड’ किंवा कोणत्या ही प्रकारे शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रश्नच येत नाही. माझ्याबाबत चुकीची माहिती पसरवणं थांबवा. अन्यथा मला तुमच्याविरोधात कायदेशीर मार्ग स्विकारावा लागेल.” सोबतच तिनं त्या युझरनं केलेल्या मेसेजचा एक स्क्रिनशॉट देखील शेअर केला आहे. सलमानची Fat बहिण कशी झाली Fit? 40 किलो वजन कमी करत दिल्या खास टिप्स

सोफियावर आरोप करणारी व्यक्ती एक महिला आहे. काही दिवसांपूर्वी तिनं सोफियाकडे मदत मागितली होती. तिनं इन्स्टाग्रामवर तिला मेसेज केला होता. परंतु सोफियानं तिच्याकडे दुर्लक्ष केलं. कारण अनेकदा असे मेसेज फेक असतात असा तिचा अनुभव आहे. त्यानंतर त्याच महिलेनं दुसऱ्या एका अकाउंटवरुन तिला मेसेज केला आणि तिचे अभिनव शुक्लासोबत संबंध असल्याचे आरोप केले. शिवाय ती वेश्या व्यवसाय करते असं देखील म्हणाली. परंतु हे सर्व आरोप सोफियानं फेटाळून लावले आहेत. ही माहिती स्वत: सोफियानं व्हिडीओद्वारे चाहत्यांना सांगितली. तिचा हा व्हिडीओ सध्या सर्वत्र चर्चेत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात