JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘मराठी अभिनेत्रींना किस करणं शोभत का?’ ट्रोलर्सला तेजस्विनी पंडितचं जोरदार प्रत्युत्तर

‘मराठी अभिनेत्रींना किस करणं शोभत का?’ ट्रोलर्सला तेजस्विनी पंडितचं जोरदार प्रत्युत्तर

समांतरमध्ये तेजस्विनी आणि स्वप्निलमधील काही किसिंग सीन देखील दाखवण्यात आले होते. (Tejaswini Pandit Kissing scene) या सीन्सवर काही प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. मराठी कलाकारांना असं शोभतं का? असा सवाल करत त्यांना ट्रोल देखील केलं होतं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 25 जून**:** गूढ रहस्यांनी भरलेल्या समांतर (Samantar) या वेब सीरिजचा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. स्वप्निल जोशी (Swapnil Joshi) आणि तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) यांच्या जबरदस्त केमिस्ट्रीमुळं ही सीरिज तुफान गाजली होती. आता प्रेक्षक या सीरिजच्या दुसऱ्या पर्वाची आतुरतेने वाट पाहात आहेत. समांतरमध्ये तेजस्विनी आणि स्वप्निलमधील काही किसिंग सीन देखील दाखवण्यात आले होते. (Tejaswini Pandit Kissing scene) या सीन्सवर काही प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. मराठी कलाकारांना असं शोभतं का? असा सवाल करत त्यांना ट्रोल देखील केलं होतं. (Tejaswini Pandit troll) या ट्रोलर्सला आता स्वत: तेजस्विनीनं प्रत्युत्तर दिलं आहे. ट्रोल तेच होतात जे चर्चेत असतात असं म्हणत तिनं उलट ट्रोलर्सचीच खिल्ली उडवली. तेजस्विनीनं एबीपीला दिलेल्या मुलाखतीत समांतरवर भाष्य केलं. त्यावेळी तिनं ट्रोलर्सला देखील प्रत्युत्तर दिलं. ती म्हणाली, “आम्ही अभिनय करत असतो. ती व्यक्तिरेखा रंगवताना त्याची गरज म्हणून काहीवेळी असे सीन द्यावे लागतात तो त्या कथानकाचा, व्यक्तिरेखेचा भाग असतो. शिवाय अशी दृश्य देणं सोपं नसतं. लोकांना ट्रोल करणं सोपं आहे. पण लोकही अशाच लोकांना ट्रोल करतात जे चर्चेत असतात. सुरुवातीला त्याची चर्चा झाली. पण नंतर समांतरचा पहिला सीझन इतका गाजला की ही गोष्ट मागे पडली.” अभिनेत्री पायल रोहतगीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; मुलांना द्यायची हातपाय तोडण्याची धमकी

संबंधित बातम्या

Michael Jackson Death Anniversary: ‘किंग ऑफ पॉप’चं 3 हजार कोटींचं घर आतून दिसतं कसं? समांतर या सीरिजद्वारे स्वप्नील जोशीनं OTT प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं. ही सीरिज नामांकित मराठी लेखक सुहास शिरवळकर यांच्या समांतर या कादंबरीवर आधारित आहे. दोन भिन्न व्यक्ती व्यक्तीचं आयुष्य एकाच हस्तरेखेवर आधारित आहे. म्हणजे एकाचा भूतकाळ हा दुसऱ्याचा भविष्यकाळ असणार आहे. असं या सीरिजचं कथानक आहे. त्यामुळं भविष्य काळात होणाऱ्या वाईट घटना स्वप्नील जोशी रोखू शकेल का? हे याचं उत्तर सांगणारी ही सीरिज आहे. गूढ कथानक, जबरदस्त अभिनय आणि तितक्याच ताकतीच दिग्दर्शन यामुळं ही सीरिज तुफान गाजली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या