JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / भीती प्रत्येकाला वाटतेय! ‘ती परत आलीये’च्या नव्या ट्रेलरनं वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

भीती प्रत्येकाला वाटतेय! ‘ती परत आलीये’च्या नव्या ट्रेलरनं वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

हा ट्रेलर पाहून तुमच्याही मनात या मालिकेबद्दल उत्सुकता निर्माण होईल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 26 जुलै**:** ‘देवमाणूस’ (Devmanus) या मालिकेने तुफान लोकप्रियता मिळवली होती. परंतु या मालिकेचा उत्तरार्ध सुरु झाला असून देवमाणूस लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्याजागी एक नवीन गूढ रहस्यमय मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  ‘ती परत आलीये’ (Tee Parat Aaliye) असं या मालिकेचं नाव आहे. नुकताच या मालिकेचा नवा ट्रेलर प्रदर्शित झाला. हा ट्रेलर पाहून तुमच्याही मनात या मालिकेबद्दल उत्सुकता निर्माण होईल. झी वाहिनीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर या नव्या मालिकेचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. जेष्ठ अभिनेते विजय कदम (Vijay Kadam) या मालिकेत एका वेगळ्या आणि लक्षवेधी भूमिकेत दिसणार आहेत. विजय कदम बऱ्याच वर्षानंतर या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. विजय कदम एका परिसरात गस्त घालत आहेत आणि त्या परिसरामध्ये काही हत्या घडत आहेत. त्यामुळे सावध राहा अशी चेतावणी देताना ते दिसत आहेत. ‘महाराष्ट्रात राहून पैसे कमावता अन् संकट आलं की पळता’; अमेय खोपकर यांचा बॉलिवूडवर निशाणा

संबंधित बातम्या

Raj Kundra कसा करायचा आर्थिक व्यवहार? धक्कादायक माहिती आली समोर या मालिकेबद्दल बोलताना विजय कदम म्हणाले की, “या मालिकेत एक रहस्यमय भागातील गूढ प्रेक्षकांना पाहायला मिळेल. इकडे आलेल्या लोकांचं काही रहस्य आहे का? ती परत आलीये म्हणजे नक्की कोण आलीये? या प्रश्नाची उत्तर प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहेत. एका रहस्यमय मालिकेत काम करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. माझी भूमिका नक्की काय आहे, हे सगळ्यांना लवकरच कळेल.” ही मालिका 16 ऑगस्ट पासून रात्री 10.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या