JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘तारक मेहता’मधली ही अभिनेत्री करणार मालिकेला रामराम?; दिली रिअ‍ॅक्शन

‘तारक मेहता’मधली ही अभिनेत्री करणार मालिकेला रामराम?; दिली रिअ‍ॅक्शन

ती गरोदर असल्यामुळं तारक मेहताला रामराम ठोकण्याचा विचार करतेय असं म्हटलं जात आहे. अखेर या चर्चेवर आता स्वत: जेनिफरनं स्पष्टीकरण दिलं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 1 जुलै**:** ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय विनोदी मालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. गेली 13 वर्ष ही मालिका सातत्यानं प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. यामधील पात्रे आज जणू प्रेक्षकांच्या घरातील एक सदस्यच झाले आहेत. इतकी प्रचंड लोकप्रियता या मालिकेनं मिळवली आहे. परंतु तरी देखील अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बंसीवाल (Jenifer Mistry Bansiwal) शो सोडून देणार असल्याची चर्चा आहे. ती गरोदर असल्यामुळं तारक मेहताला रामराम ठोकण्याचा विचार करतेय असं म्हटलं जात आहे. अखेर या चर्चेवर आता स्वत: जेनिफरनं स्पष्टीकरण दिलं. जेनिफर तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये रोशन सिंग सोधीच्या पत्नीची भूमिका साकारते. मालिकेत तिचं देखील नाव रोशन असंच आहे. या व्यक्तिरेखेमुळं ती तुफान लोकप्रिय झाली. अनेक प्रेक्षक तिला तिच्या खऱ्या नावाऐवजी रोशन सोधी याच नावानं ओळखतात. मात्र इतकी प्रचंड लोकप्रियता मिळालेली असताना देखील ती या मालिकेला का सोडणार आहे? जेनिफरनं स्वत:च या चर्चेवर स्पष्टीकरण दिलं. ‘सीतेच्या भूमिकेसाठी मानधन वाढवलं ते योग्यच केलं’; तापसीनं केली करीनाची पाठराखण

संबंधित बातम्या

पूजा बत्रासारखी हुबेहुब दिसणारी ही तरुणी आहे तरी कोण? आहेत लाखो फॉलोअर्स तिनं एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी तिनं या चर्चेवर उत्तर दिलं. ती म्हणाली, “मी मालिका सोडणार नाही. उगाच काही लोक खोट्या बातम्या पसरवत आहेत. प्रेक्षकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं. गेले काही दिवस माझे पाय प्रचंड दुखत आहेत. त्यामुळं उपचार करण्यासाठी मी थोडा ब्रेक घेतला आहे. मी गरोदर वगैरे नाही. लवकरच नव्या कथानकासह मी तारक मेहतामध्ये पुनरागमन करेन.”

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या