मुंबई 12 ऑगस्ट: तारक मेहता का उलटा चश्मा ही मालिका अनेक कारणांनी चर्चेत येत असते. सध्या या मालिकेतून एक एक महत्त्वाचे कलाकार बाहेर पडताना दिसत आहेत. दयाबेनचं पात्र साकारणाऱ्या दिशा वाकाणीने मालिका सोडून एवढी वर्ष झाली तरी तिची रिप्लेसमेंट म्हणून दुसरी अभिनेत्री दिसून आलेली नव्हती. पण दर काही दिवसांनी नव्या दयाबेनच्या नावाची सुद्धा चर्चा होताना दिसत असते. आता यामध्ये अजून एका अभिनेत्रीच्या नावाची भर पडताना दिसत आहे. बॉम्बे टाइम्सच्या रिपोर्टनुसार दयाबेनच्या भूमिकेसाठी काजल पिसल (kajal pisal as dayaben in tmkoc) या अभिनेत्रीच्या नावाची चर्चा होत आहे. मालिकेच्या निर्मात्यांनी तिला भूमिकेसाठी जवळपास पक्क केल्याचं सांगण्यात येत आहे. याआधी राखी विजान या अभिनेत्रीच्या नावाची जबरदस्त चर्चा होत होती. मात्र त्यानंतरही मालिकेत दयाबेन दिसून आली नव्हती. आता आलेल्या माहितीनुसार काजल या अभिनेत्रींच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. यानंतर तरी मालिकेत दयाबेन दिसून येणार का हे पाहावं लागेल. मालिकेतून दयाबेनचं पात्र गेल्यापासून अनेकांची निराशा झाली होती. या अन त्या कारणांनी दया या पत्राचा विषय निघत होता पण मालिकेत दयाचं पात्र परत यायचे संकेत मिळत नव्हते. या दरम्यान दिशा वाकाणी पुन्हा दिसून येईल अशी चर्चा सुद्धा जोर धरत होती. पण दयाबेनचं पात्र मालिकेत दिसायचा अजून मुहूर्त लागला नाही हेच खरं. सतत दयाबेनच्या येयन्याची उत्सुकता ताणली जाते आणि त्यातून काहीच निष्पन्न निघत नसल्याने चाहते सुद्धा आता या प्रकाराला कंटाळले आहेत. हे ही वाचा- Sidharth Malhotra: ‘शेरशाह’ ला एक वर्ष पूर्ण होताच सिद्धार्थ किआरा निघाले सिक्रेट ‘डेट’वर; केला खुलासा दरवेळी नुसतीच हूल देऊन प्रत्यक्षात मात्र दयाबेन दिसायची चिन्हही नसल्याने नेमका या प्रकरणावर पडदा कधी पडणार हे आता पाहावं लागेल. दरम्यान काजल पिसल या अभिनेत्रीने जर भूमिका स्वीकारली तर लगेचच तिला शूटिंग सुरु करावं लागेल असं सांगितलं जात आहे.
एकीकडे दयाबेनला बघायला आतुर झालेला चाहतावर्ग आहे तर दुसरीकडे मालिकेतून काही म्हह्त्वाच्या पात्रांची विकेट उडताना दिसत आहे. तारक मेहता हे महत्त्वाचं पात्र निभावणारे शैलेश लोढा यांनी मालिका सोडली. दिशा वकानी, नेहा मेहता या कलाकारांनी मालिका सोडली. तसंच टप्पू म्हणजे राज अनादकटने सुद्धा मालिकेतून एक्झिट घेतल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. महत्त्वाच्या पात्रांनी मालिका सोडल्यानंतर मालिकेच्या मेकर्सनी स्वतःच मत सुद्धा व्यक्त केलं होतं. मालिका कोणासाठी थांबणार नाही, नवे तारक मेहता येतील आणि जुनेच टीममध्ये पुन्हा आले तरी आनंद आहे नवे कलाकार आले तरी आनंद आहे. असं म्हणत निर्माते असितकुमार मोदी व्यक्त झाले होते. दरम्यान नव्या दयाबेनच्या पात्रासाठी समोर आलेल्या अभिनेत्रींच्या नावावर कोणतंही ठोस स्पष्टीकरण अद्याप समोर आलेलं नाही.