JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Dobaaraa trailer: शाबाश मिठूनंतर तापसी पन्नूचा सस्पेन्स थ्रिलर येणार भेटीला; ट्रेलर बघून व्हाल सुन्न

Dobaaraa trailer: शाबाश मिठूनंतर तापसी पन्नूचा सस्पेन्स थ्रिलर येणार भेटीला; ट्रेलर बघून व्हाल सुन्न

तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप या जोडीचा दोबारा हा सस्पेन्स सिनेमा लवकरच भेटीला येणार आहे. त्याचा ट्रेलर आज रिलीज करण्यात आला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 27 जुलै: तापसी पन्नू या अभिनेत्रीचं करिअर सध्या एका वेगळ्या उंचीला पोहोचलं आहे. मिताली राज या महिला क्रिकेटरच्या आयुष्यावरील शाबाश मिठू या सिनेमातील तिच्या उत्तम कामगिरीनंतर आता तापसी एका नव्याकोऱ्या सस्पेन्स सिनेमातून भेटीला येणार आहे. ‘दोबारा’ असं या सिनेमाचं नाव असून त्याचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. अनुराग कश्यप या दिग्दर्शकाने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून सिनेमाचं नावंच सध्या फार चर्चेचा विषय ठरत आहे. सिनेमाचा ट्रेलर हा थरकाप उडवणारा असून यामध्ये तापसी (taapsee pannu) एका वेगळ्याच अंदाजात दिसून येत आहे. रहस्य आणि थरार यांनी भरलेला हा सिनेमा एका बारा वर्षाच्या मुलाभोवती फिरणारं कथानक दाखवणारा असणार आहे. यामध्ये या मुलाचा जीव वाचवण्याची जबाबदारी तापसीवर येऊन पडते असं सुद्धा ट्रेलरमध्ये दिसत आहे. या सिनेमाचं नाव बरंच इंटरेस्टिंग आहे आणि याचा संबंध 2 आणि 12 या आकड्यांशी आहे. ट्रेलर बघताना अनेक ठिकाणी भीतीने थरकाप उडायची शक्यता आहे असं समोर येत आहे. पण अनेक दिवसांनी बॉलिवूडमध्ये एक सॉलिड थरारपट बघायला मिळत असल्याने चाहत्यांमध्ये बरीच उत्सुकता दिसून येत आहे.

संबंधित बातम्या

सध्या तापसी पन्नू एकाहून एक सरस सिनेमांमध्ये झळकताना दिसत आहे. आपल्या अभिनयाची विविधता ती प्रत्येक प्रोजेक्टमध्ये दाखवून देताना दिसत आहे. दोबारामध्ये सुद्धा असंच वेगळेपण जपताना ती दिसेल असं ट्रेलरमध्ये दिसून येत आहे. हा सिनेमा स्पॅनिश फिल्म मिराजचा हिंदी रिमेक असून हा सिनेमा येत्या 19 ऑगस्टला रिलीज होणार आहे. या निमित्ताने अनुराग कश्यपसारखा दिग्दर्शक वेगळा विषय घेऊन समोर येत आहे. तापसी आणि अनुराग यांनी आधी मनमर्जिया नावाचा चित्रपट एकत्र केला होता. या दोघांचा हा थरारपट अनेक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये नावाजला गेला आहे. हे ही वाचा-  Tiger Shroff- Disha Patani breakup: टायगर-दिशा यांचं ब्रेकअप; 6 वर्षांचं नातं संपुष्टात तापसी येत्या काळात किंग खान शाहरुखसोबत राजकुमार हिरानी यांच्या डंकी सिनेमात बघायला मिळणार आहे. तापसी मागच्या काळात अनेक खेळाशी संबंधित सिनेमांत दिसून आली होती. तिचा हा आगळावेगळा अंदाज ट्रेलरमध्ये झळकताना दिसत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या