JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Sushmita Sen: हार्ट अटॅक नंतर लगेचच कामावर परतली सुष्मिता; 'तो' रॅम्प वॉक पाहून चाहते थक्क

Sushmita Sen: हार्ट अटॅक नंतर लगेचच कामावर परतली सुष्मिता; 'तो' रॅम्प वॉक पाहून चाहते थक्क

हार्ट अटॅक येऊन गेल्याला काही दिवसच उलटले असून सुष्मिता सेन लगेच कामावर परतली आहे. तिचा नुकताच एक व्हिडीओ समोर आला आहे.

जाहिरात

सुष्मिता सेन

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 मार्च :  मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्ससोबतच बॉलिवूडची यशस्वी अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या तिच्या तब्येतीमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तिला हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतर तिची एंजिओप्लास्टी देखील करण्यात आली होती. अभिनेत्रीनं केलेल्या या खुलाश्यानंतर चाहत्यांमध्ये खळबळ माजली होती. तिने चाहत्यांना तिची तब्येत आता व्यवस्थित असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर चाहत्यांसोबत संवाद साधण्यासाठी ती लाईव्ह देखील आली होती. पण तेव्हा सुद्धा तिची तब्येत काही ठीक नव्हती. त्यामुळे तिचे चाहते काहीसे चिंतेतच होते. पण आता हार्ट अटॅक येऊन गेल्याला काही दिवसच उलटले असून अभिनेत्री लगेच कामावर परतली आहे. तिचा नुकताच एक व्हिडीओ समोर आला आहे. सुष्मिता सेन नुकतीच एका फॅशन शोमध्ये पोहोचली होती. ज्याचा व्हिडिओ समोर येत आहे. एका व्हिडिओमध्ये तिच्यासोबत तिच्या एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉही दिसत आहे. हार्ट अटॅकनंतर लगेचच तिला कामावर परतलेलं पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. एका फॅशन शोदरम्यान सुष्मिताने रॅम्प वॉक केला. यावेळी तिने सुंदर पिवळ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. रॅम्पवर येताना तिच्या हातात फुलांचा गुच्छही होता, जो तिने समोर बसलेल्या एका व्यक्तीला दिला. यासोबतच तिने लवकर बरी झाल्यामुळे  देवाचे आभार देखील मानले. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Ileana D’Cruz Ban: अजय देवगणच्या ‘या’ हिरोईनवर तमिळ इंडस्ट्रीनं घातलीय बंदी? अखेर समोर आलं सत्य सुष्मिता सेनचा हा व्हिडिओ पाहून लोकांनी प्रतिक्रिया दिल्या. एका युजरने लिहिले, ‘मला नेहमीच सुष्मिता सेन जास्त आवडते.’ काहींनी तिला रॉकस्टार म्हटले आहे.  काहींनी तिच्या शैली आणि आवाजाचे कौतुक केले. सुष्मिताचा फिटनेस पाहून आज ती अनेक चाहत्यांसाठी प्रेरणास्थान ठरली आहे.

संबंधित बातम्या

सुष्मिता 47 वर्षांची आहे आणि तिला नेहमीच फिट राहायला आवडते. अभिनेत्री अनेकदा तिचे फिटनेस व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचा या वयातील फिटनेस पाहून अनेक चाहत्यांना प्रेरणा मिळते.

सुष्मिता सेन लवकरच ‘आर्या 3’  वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. तिने लवकरच बरी होऊन आर्या ३ च्या सेटवर परतणार असल्याचं सांगितलं होतं. ‘आर्या’ या वेब सिरीजच्या तिसऱ्या सीझनचा नुकताच टीझर प्रदर्शित झाला. तिला आर्याच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. तसंच येणाऱ्या काळात ती आर्या सोबतच येणाऱ्या काळात ताली या वेबसिरीज मध्ये देखील दिसणार आहे. मात्र, ही वेब सीरिज कधी प्रदर्शित होणार, याची माहिती देण्यात आलेली नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या