कॉलीवूड म्हणजेच तामिळ चित्रपट उद्योगाने अभिनेत्रीवर कायमची बंदी घातली असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, आता याबाबतचा खुलासा समोर आला आहे.
रिपोर्ट्सनुसार, इलियाना डिक्रूझने एका तमिळ चित्रपटासाठी आगाऊ रक्कम घेतली होती, परंतु तिने कधीही चित्रपटासाठी शूटिंग केले नाही.
यामुळे चित्रपट निर्मात्याचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जाते आणि त्यानंतर त्यांनी तमिळ चित्रपट निर्माता परिषदेकडे तक्रार केली.
आता Indiatoday.in ने या संपूर्ण प्रकरणाची सत्यता जाणून घेण्यासाठी तमिळ फिल्म प्रोड्यूसर्सशी (TFPC) चर्चा केली, तेव्हा ही माहिती पूर्णपणे चुकीची असल्याची माहिती समोर आली आहे.
त्यांच्याकडून अशी कोणतीही बंदी घालण्यात आलेली नाही, असे टीएफपीसीने म्हटले आहे. ही अफवा कुठून आली हे कोणालाच माहीत नाही.
इलियानाने जेव्हा बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली तेव्हा ती टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री होती.
साऊथमध्ये तिने फार चित्रपटांमध्ये काम केलं नसलं तरी तिथेही तिची तगडी फॅन फॉलोइंग आहे. ती 2018 मध्ये रवी तेजाच्या 'अमर अकबर अँथनी'मध्ये दिसली होती.
इलियानाचा शेवटचा तमिळ चित्रपट 2012 मध्ये थलपथी विजयसोबत आला होता. इलियानावर कॉलिवूडमध्ये बंदी असल्याची बातमी येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही असं झालेलं आहे.