JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / मिका सिंगनं गरीबांना दिला मदतीचा हात; मुंबईच्या रस्त्यावर वाटले पैसे

मिका सिंगनं गरीबांना दिला मदतीचा हात; मुंबईच्या रस्त्यावर वाटले पैसे

सध्या मिकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. यात मिका सायकलवरून गरजूंची मदत करत आहे. तर यावेळी मिका ने चक्क गरजूनां पैसे वाटले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 13 मे: सध्याची देशातील परिस्थिती ही चिंताजनकच आहे. कोरोनाचा (Corona) फैलाव हा अतिशय वेगाने होत आहे. अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. मृतांचा आकडा वाढत आहे. अशातच लॉकडाउनमुळे अनेकांच हातावर पोट असणाऱ्यांचे आतोनात हाल होत आहेत. अनेकजन आता मदतीला पुढे येत आहेत. अशातच गायक मिका सिंग (Mika Singh) ही गोरगरिबांच्या मदतील पुढे सरसावला आहे. सध्या मिकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. यात मिका सायकलवरून गरजूंची मदत करत आहे. तर यावेळी मिका ने चक्क गरजूनां पैसे वाटले आहेत. या व्हिडिओत मिका गरजू व्यक्तींना हाक मारून बोलावत आहे व त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. मिका त्यांना 500- 500  रुपयांच्या नोटा देत आहे.

नक्की कोणावर होणार कारवाई? श्वेता-अभिनवमधील वादात महिला आयोगाची एण्ट्री

व्हिडीओत काहीजन मिकाला आशीर्वाद देत आहेत. त्यानंतर पुढे तो एका अपंग व्यक्तिशी बोलतो थांबून मिका त्यांची विचारपूस करतो. मिका त्याला विचारतो, “तुम्ही इथेच राहता? किती जण आहेत तुमच्या कुटुंबात?” तेव्हा तो व्यक्ती 5 असं म्हणतो. तेव्हा मिका त्याला आपण मदत करू असं म्हणत उद्या किराणा सामान आणून देईन , अस आश्वासनही त्या व्यक्तिला देतो.

मिकाचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हयरल होतं आहे. आधीही मिकाने लोकांची मदत केली आहे. काही दिवसांपूर्वी त्याने दिल्ली तसेच मुंबईत जेवनाचे लंगर आयोजीत केले होतेय यामार्फत त्याने 1 हजार लोकांच्या जेवनाची व्यवस्था केली होती.

संबंधित बातम्या

मिकासह इतरही बॉलिवूड सेलिब्रिटी आपापल्या परीने मदत करत आहेत. यात अभिनेता सोनू सूद, सलमान खान, अजय देवगन, अक्षय कुमार यांचाही समावेश आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या