JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'जाडी कमी करण्यासाठी पिझ्झा खाण्यापेक्षा...' आशा भोसले यांनी महिलांना दिल्या खास फिटनेस टिप्स

'जाडी कमी करण्यासाठी पिझ्झा खाण्यापेक्षा...' आशा भोसले यांनी महिलांना दिल्या खास फिटनेस टिप्स

प्रसिद्ध गायिका आशा भोसले ( singer asha bhosle ) यांनी नुकतंच मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान बालपणीच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. त्यासोबतच त्यांनी महिला वर्गाला काही फिटनेस टिप्सही ( fitness tips ) देखील दिल्या आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 मे- प्रसिद्ध गायिका आशा भोसले  (  singer asha bhosle ) यांनी नुकतंच मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान बालपणीच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. त्यासोबतच त्यांनी महिला वर्गाला काही फिटनेस टिप्सही (  fitness tips  ) देखील दिल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांनी महिलांच्यात वाढत असलेला जाडापणा पाहून त्यांना पिझ्झा (PIZZA )  खाण्यापेक्षा भाकरी खाण्याचा सल्ला दिला आहे. गायिका आशा भोसले यांनी नुकतीच मुंबईतील एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी त्यांनी महिलांना फिटनेस टिप्स दिल्या. त्या म्हणाल्या की, मी बालपणी जास्त जाड नव्हते पण फारच गोड होती. त्यावेळी दीदी मला कडेवर घेऊन जायच्या. तिला मी फार आवडायची. पण त्यानंतर काही वर्षांनी मी जाड झाली आणि तो जाडपणा बरेच वर्ष राहिला. त्यावेळी उंचीच्या मानानं वजन जास्त झालं होतं. ते वजन कमी करण्यासाठी मी बरेच प्रयत्न केले. मला त्यावेळी साधे काही खाल्लं तर गाणी गाता येत नव्हते. मी चार- पाच गाणी दिवसातून गायचे. आता मात्र मी वयाच्या 60 व्या वर्षापासून माझं वजन 65 किलो ठेवलं आहे. वाचा- ‘मुंबईकर असल्याचा अभिमान..’ या अभिनेत्याने 3 वर्षांनी केला लोकलने प्रवास त्या पुढे अमेरिकेतील एक आठवण सांगताना म्हणाल्या की, मी जेव्हा अमेरिकेत होते तेव्हा मी काही महिला रडत असल्याचे पाहिले. मी सहजच पुढे जाऊन बघितलं तर तेव्हा मला त्यांच्या रडण्याचे कारण समजले. त्यांची मुलं ही फार जाड होती. त्यांना चालताही येत नसल्याचे मला समजलं. मग काय मी लगेच तिथूनच तातडीने माझ्या सूनेला फोन केला आणि तिला सांगितलं की, माझ्या नातवाला पाकिटातील बंद असं काहीच खायला देऊ नको. त्याला फक्त घरातील वरण भात, पोळी देण्यास सांगितलं. वाचा-  हा कोणता अवतार?’; रामायणातील सीतेला स्कूल यूनिफॉर्ममध्ये पाहून भडकले नेटकरी आपलं पाहून अनेक लहान मुलं देखील तेच खायला शिकतात. जर तुम्ही त्यांच्यासमोर पिझ्झा खाल्ला तर ती लहान मुलं देखील पिझ्झाच खाणार. तुम्ही भाकरी का खात नाही?.असा देखील प्रश्न त्यांनी केला. यावेळी त्यांनी पिझ्झा खाण्यापेक्षा भाकरी खाण्याचा सल्ला महिला वर्गाला दिला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या