Home /News /entertainment /

'मुंबईकर असल्याचा अभिमान...' या अभिनेत्याने तीन वर्षांनी केला लोकलने प्रवास, फोटो झाले Viral

'मुंबईकर असल्याचा अभिमान...' या अभिनेत्याने तीन वर्षांनी केला लोकलने प्रवास, फोटो झाले Viral

टीव्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेत्याचे लोकल वारीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

  मुंबई, 23 मे- 'आवाज'मध्ये 'संत ज्ञानेश्वर' या भूमिकेतून यशोमन आपटेनं ( yoshomman apte ) चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. नंतर या कलाकाराची, 'टीव्हीवरचा निळ्या डोळ्यांचा अभिनेता' अशी ओळख बनली. त्यानंचर तो फुलपाखरू या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचला. सध्या यशोमनचे काही फोटो सोशल मीडियावर फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. यामध्ये तो मुंबई लोकलने ( Mumbai local train) प्रवास करताना दिसत आहे. यशोमनने इन्स्टावर त्याचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तो मुंबई लोकलने ( Mumbai local) प्रवास करताना दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसत आहे. त्याने लोकल प्रवासाचे फोटो शेअर करत म्हटलं आहे की, मला ट्रेनने प्रवास करून 3 वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. खूप नॉस्टॅल्जिक होतं😍 अभिमान आहे मी मुंबईकर असल्याचा...असं म्हणत त्यानं मुंबई लोकलनं प्रवास केल्याचा आनंद सर्वांसोबत शेअर केला आहे. वाचा-'मोदीची आंबाबर्फी मला लै आवडती..' किरण मानेंची नवी पोस्ट चर्चेत अनेकवेळा कलाकारांना नाटकाचे प्रयोग असतील किंवा मालिकेच्या चित्रकरणाच्या ठिकाणी वेळेत पोहचयाचे असते. तेव्हा मुंबईची लोकलं बेस्ट पर्याय आहे. म्हणून तर लोकलला मुंबईची जीवनवाहिनी म्हणतात. मध्यंतरी अभिनेता सागर कारंडे. प्रिया मराठे, मुक्ता बर्वे तसेच सोनाली कुलकर्णी यांनी देखील मुंबई लोकलनं प्रवास केला होता. मुंबई लोकलनं प्रवास केल्याचा आनंद या सेलेब्सनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केला होता.
  एकदा सेलिब्रिटी झालं की, कलाकारांना काही बंधने येत असताता. गर्दीच्या ठिकाणी देखील जाता येत नसतं. अशावेळी अनेक गोष्टी करायच्या असतात पण त्या करता येत नाहीत. पण कधीकधी काही कलाकार योग्य काळजी घेऊन आपल्या मनाला आनंद देणाऱ्या गोष्टी करत असतात. असाच काही कलाकारांनी लोकलने प्रवास करण्याचा देखील आनंद घेतला आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या