मुंबई, 23 मे: ऐंशीच्या दशकात टेलिव्हिजनवर लोकप्रियता मिळवणारी मालिका म्हणजे रामायण (Ramayan) आणि महाभारत (Mahabharat) दोन्ही मालिकांची चर्चा आजही होत असते. रामायणात राम (Ram) आणि सीतेची (Sita) भूमिका साकारणारे कलाकार प्रेक्षकांसाठी तर देवसमान होते. मालिकेत रामाची भूमिका अभिनेता अरुण गोविल यांनी (Arun Govil) साकारली होती तर सीतेची भूमिका दीपिका चिखलियाने (dipika chilkania) साकारली होती. रामायण ही मालिका आजपर्यंत जवळपास 650 मिलियन लोकांनी पाहिली आहे. आतापर्यंतच्या मालिकांच्या इतिहासातील ही रेकॉर्ड तोड मालिका होती. मालिकेतील सीतेच्या भूमिकेतील अभिनेत्री दीपिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. परंतू दीपिकाने केलेल्या एका पोस्टमुळे ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. सोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यात आलं आहे. दीपिकाने रविवारी सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केलेत. ज्यात ती स्कूल यूनिफॉर्ममध्ये दिसत आहे. तिच्यासोबत तिच्या दोन मैत्रिणी असून तिघीही मॉर्डन अवतारात आहेत. खरंतर दीपिकाने रामायणात साकारलेल्या सीतेच्या भूमिकेला तोड नाही. तिच्या इतकी उत्तम सीता आजवर कोणी साकारली नाही असे म्हटलं जातं. त्यामुळे दीपिकाला अशा मॉर्डन अंदाजात पाहून नेटकऱ्यांनी तिच्यावर चांगलाच निशाणा साधलाय. हेही वाचा - शैलेश लोढानंतर ‘बबीता जी’ सोडणार ‘तारक मेहता…’?, मुनमुन दत्ता या शोमध्ये दिसण्याची शक्यता दीपिकाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने व्हाइट शर्ट , ब्लू शॉर्ट स्कर्ट घातला असून ती बोल्ड अंदाजात दिसत आहे. तर दीपिकाने फोटोत एका हातात ड्रिंक बॉटलही धरली आहे. तर तिच्या इतर दोन मैत्रिणी नेकटाई आणि स्नीकर्समध्ये दिसत आहेत. ‘रविवारी आम्ही शाळेला निघालोय’, असं म्हणतं दीपिकाने हा फोटो शेअर केला आहे. फोटोत तिघींकडे पाहून त्या नशेत आहेत असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. तर काहींनी ‘सीतेचा हा कोणता अवतार?’, असं म्हणतं दीपिकाला ट्रोल केलं आहे. दीपिकाच्या फोटोवर आलेल्या कमेंटकडे लक्ष दिलं तर लक्षात येतेय तिच्या फोटोची तिच्या सीता या पात्राबरोबर तुलना करण्यात आली आहे. एका युझरने म्हटलेय, ‘सीता माँने हा कोणता अवतार घेतला’. तर दुसऱ्यानं म्हटलंय, ‘माँने तिच्या हातात कोणती ड्रिंक बाटली घेतली आहे’. तर आणखी एका युझरनं म्हटलं, ‘तुम्ही असे कपडे घालायला नको होते. आम्ही तुम्हाला देवी समान दर्जा दिला आहे’. सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाल्यानंतर दीपिकाला चांगल्याच ट्रोलिंगचा सामना करावा लागल्याने दीपिकाने तिची पोस्ट डिलीट केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.