मुंबई, 02 सप्टेंबर: प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या (Sidharth Shukla) अशा अचानक जाण्याने संपूर्ण मनोरंजन विश्व हादरलं आहे. दरम्यान मुंबई पोलिसांनी या घटनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. डीसीपींनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धार्थचा मृतदेह (Sidharth Shukla Died) कूपर रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. आता हे सांगणं कठीण आहे की त्याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेडिकल आणि पोस्ट मार्टम अहवालानंतर त्याचप्रमाणे सिद्धार्थसह राहणाऱ्यांचा जबाब नोंदवला जाईल, त्यानंतर यावर स्पष्ट काही सांगता येईल. सूत्रांच्या माहितीनुसा पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत आहेत. मेडिकल अहवाल आणि पोस्ट मॉर्टम अहवाल समोर येईल आणि त्याचप्रमाणे त्याच्यासह राहणाऱ्यांचे जबाब नोंदवले जातील, मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे मात्र त्याच्या शरिरावर कोणतीह बाह्य जखम नाही आहे. सिद्धार्थ शुक्लाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. हे वाचा- BIG BREAKING: बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन साधारण साडेबाराच्या सुमारास शवविच्छेदन करण्यात येणार आहे. दरम्यान सिद्धार्थची बहिण आणि तिचा नवरा रुग्णालयात दाखल झाले आहेत. मुंबई पोलिसांची टीम आणि एसआरपीएफची तुकडी कूपर रुग्णालयात पोहोचली आहे. अगदी कमी वयात सिद्धार्थने यशाचं शिखर गाठलं होतं. मालिका, वेबसीरिज त्याचप्रमाणे विविध अल्बममध्ये त्याने त्याच्या अभिनयाची छाप उमटवली होती. त्याचं असं अचानक जाणं सर्वांसाठीच धक्कादायक होतं. बालिका वधूनंतर बिग बॉसने त्याला मोठी ओळख निर्माण करून दिली होती. करिअरच्या उच्च शिखरावर असताना सिद्धार्थचं असं जाणं चटका लावणारं आहे.