Home /News /entertainment /

BIG BREAKING: बिग बॉस विजेता अभिनेता Sidharth Shukla चे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

BIG BREAKING: बिग बॉस विजेता अभिनेता Sidharth Shukla चे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

प्रसिद्ध अभिनेता आणि बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्लाचे (Sidharth Shukla Died of Heart Attack) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

  मुंबई, 02 सप्टेंबर: प्रसिद्ध अभिनेता आणि बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्लाचे (Sidharth Shukla Died of Heart Attack) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. संपूर्ण मनोरंजन विश्वासाठी अत्यंत धक्कादायक बातमी आहे. वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी सिद्धार्थने जगाचा निरोप घेतला आहे.

  बुधवारी रात्री त्याने कोणती तरी गोळी घेऊन तो झोपला होता असल्याची माहिती काही मीडिया अहवालात देण्यात आली आहे. त्याच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण मनोरंजन विश्व हादरलं आहे. अशी माहिती समोर आली आहे की, सिद्धार्थ शुक्ला याला गुरुवारी सकाळी छातीत दुखत असल्यामुळे कूपर रुग्णालयात (Mumbai's Cooper Hospital) दाखल करण्यात आले. रुग्णालयात आणल्यानंतर असे समजले होते की, त्याला हृदयविकाराचा झटका आला आहे. कूपर रुग्णालयात आणण्यापूर्वीच सकाळी साधारण 9.25  वाजता त्याचा मृत्यू झाला होता. कूपर रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार कोणतीही बाह्य जखम (External Injury) आढळून आलेली नाही. दरम्यान सिद्धार्थची बहिण आणि तिचा नवरा रुग्णालयात दाखल झाले आहेत. मुंबई पोलिसांची टीम आणि एसआरपीएफची तुकडी कूपर रुग्णालयात पोहोचली आहे. सिद्धार्थच्या पश्चात आई तसेच दोन बहिणी असा परिवार आहे. आपल्या कुटुंबींयांच्या तो अगदी जवळ होता. बिग बॉस जिंकल्यानंतर त्याने फॅमिलीसह फोटो देखील शेअर केले होते. त्यावेळी मुलाच्या जिंकण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. सिद्धार्थच्या करिअरच्या सुरूवातीच्या काळातच सिद्धार्थच्या वडिलांनी जगाचा निरोप घेतला होता. मुळचं उत्तर प्रदेशचं असलेलं शुक्ला कुटुंब अनेक वर्षे मुंबईतच वास्तव्यास आहे. सिद्धार्थचा जन्मही मुंबईतच झाला होता. बिग बॉस जिंकल्यापासून सिद्धार्थ टेलिव्हिजन विश्वातील एक महत्त्वाचं नाव झालं होतं. त्याचे कोट्यवधी चाहते होते. सिद्धार्थच्या अशा अकाली एक्झिटमुळे चाहत्यांनाही मोठं दु:ख झालं आहे. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट देखील केल्या आहेत.

  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  Tags: Siddharth shukla

  पुढील बातम्या