JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'Sidharth Shukla चा मृत्यू Heart attack मुळे होऊच शकत नाही', जिम ट्रेनरच्या दाव्यामुळे प्रकरणाला नवा ट्विस्ट

'Sidharth Shukla चा मृत्यू Heart attack मुळे होऊच शकत नाही', जिम ट्रेनरच्या दाव्यामुळे प्रकरणाला नवा ट्विस्ट

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचा (Sidharth shukla) जिम ट्रेनर सोनू चौरसियाने न्यूज 18 ला एक्सक्लुझिव्ह माहिती दिली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 02 सप्टेंबर : अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचा (Sidharth Shukla) मृत्यू हार्ट अटॅकमुळे (Sidharth Shukla heart attack)  झाल्याचं सांगितलं जातं आहे. कुपर हॉस्पिटलने (Cooper hospital) त्याला हार्ट अटॅक आल्याचं सांगितलं. पण आता सिद्धार्थच्या जीम ट्रेनर (Sidharth Shukla’s gym trainer) सिद्धार्थचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे होऊच शकत नाही असा दावा केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता नवा ट्विस्ट आला आहे. सिद्धार्थ शुक्लाचा जिम ट्रेनर सोनू चौरसियाने  न्यूज 18 शी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली. त्यावेळी त्यांनी सिद्धार्थच्या मृत्यूला हार्ट अटॅक कारणीभूत आहे, हे फेटाळलं आहे. त्याबाबत त्यांनी स्पष्टीकरणही दिलं आहे. सिद्धार्थला आपण गेल्या दीड वर्षांपासून जिम ट्रेनिंग देत होतो. तो फिट होता आणि फिटनेसबाबत तो खूप जागरूक होता. जिममध्ये तो खूप हार्ड वर्क करायचा, असं त्यांनी सांगितलं. हे वाचा -  ‘आयुष्य खूप लहान आहे…’; सिद्धार्थ शुक्लाला आधीच मिळाले होते संकेत? सोनू यांनी सांगितलं, “मला राहुल वैद्यचा सकाळी 9.30 ला फोन आला की सिद्धार्थची तब्येत बिघडली आहे. सुरुवातीला मला विश्वास बसल नाही पण नंतर फोनवर फोन येऊ लागले. सिद्धार्थच्या मृत्यूबाबत ऐकून मला शॉक बसला आहे. सिद्धार्थ कधीच मानसिक तणावात किंवा डिप्रेशनमध्ये नव्हता. नेहमी आनंदी राहणारा आणि इतरांना आनंदी ठेवणारा असा तो माणूस होता. जिममध्ये तो नेहमी आनंदी असायचा खूप मेहनत करायचा. आम्ही नेहमी सकाळी 10.30 वाजता जिममध्ये भेटायचो.  रात्री जेवणानंतरसुद्धा तो 40 मिनिटं वॉक करायचा” हे वाचा -  Sidharth Shukla Death: पहाटे 3 वाजता आईने दिला थंड पाण्याचा ग्लास, त्यानंतर … “काल रात्री 11.30 च्या सुमाराच तो एका मीटिंगमधून आला. तो मीटिंगदरम्यान बाहेर काहीतरी खाऊन आला होता. त्यामुळे रात्री ताक प्यायला आणि काही फळं खाऊन तो 1.30 च्या सुमारास झोपायला गेला. सकाळी त्याची आई त्याला उठवायला गेली तेव्हा तो सरळ झोपला होता. तो असा कधीच झोपत नाही. लगेच डॉक्टरांना बोलवण्यात आलं, पण त्याची तब्येत जास्त खराब असल्याने डॉक्टरांनी त्याला रुग्णालयात दाखल करायला सांगितलं. रुग्णालयात नेताना त्याचा मृत्यू झाला. आता मला पोस्टमॉर्टेम रिपोर्टची प्रतीक्षा आहे. कारण त्याचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे होऊ शकतो, हे मी मानूच शकत नाही”, असं त्यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या