मुंबई, 2 सप्टेंबर- बिग बॉस विजेता आणि छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या (Sidharth Shukla) अशा अचानक मृत्यूने संपूर्ण मनोरंजन विश्व हादरलं आहे. त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाला असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान त्याच्या आईने आपला जबाब नोंदवला आहे.
पोलिसांच्या मते, सिद्धार्थच्या आईने आपल्या जबाबात म्हटलं आहे, ‘रात्री 3 ते 3.30 च्या दरम्यान सिद्धार्थच्या छातीत दुखत होतं. त्याने याबद्दल आपल्या आईला येऊन सांगितलं. त्यानंतर पाणी पिऊन तो झोपण्यासाठी गेला. सकाळी उठल्यानंतर त्याने पुन्हा आईजवळ छातीत दुखत असल्याचं सांगितलं. त्यानंतर पाणी पिऊन तो बेशुद्ध झाला. यावर आईने डॉक्टरांना बोलवलं. त्यावेळी सिद्धार्थचे ठोके जाणवत नव्हते. म्हणून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तपसानंतर डॉक्टरांनी सिद्धार्थला मृत घोषित केलं’.
(हे वाचा:सुशांतच्या मृत्यूशी जोडलं जातंय सिद्धार्थच्या मृत्यूचं रहस्य )
सिद्धार्थने छोट्या पडद्यावरून आपल्या अभिनयाला सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. सिद्धार्थ एक मॉडेलसुद्धा होता. त्याला बिग बॉस 13 मध्ये प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. या पर्वाचा तो विजेतादेखील ठरला होता. याच शोमध्ये त्याची शेहनाज गिलसोबत जवळीक निर्माण झाली होती. हे दोघेही प्रेमात आकंठ बुडाले होते. ही जोडी सिडनाज म्हणून सोशल मीडियावर फेमस झाली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Siddharth shukla