मुंबई 28 जुलै : अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) अनेक दिवसांनंतर मराठी छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. विशेष म्हणजे एका मराठी मालिकेतून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांची ही उत्सुकता वाढली आहे. मराठी तसेच बॉलिवूड आणि हिंदी सिनेसृष्टीत श्रेयसने नाव कमावलं आहे. लवकरच तो झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर एका नव्या मालिकेत दिसणार आहे. ‘तुझी माझी रेशीम गाठ’ (Tujhi Mazhi Reshim Gath) असं या मालिकेचं नाव आहे. तर प्रोमोत श्रेयस एका रेस्तरॉ मध्ये बसला आहे व एका लहान मुलीशी संवाद साधत आहे. पण त्याचं लक्ष आणखीनच कुठेतरी असतं.
लवकरच ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान झी मराठी वाहिनीवर सध्या अनेक नव्या मालिकांची घोषणा झाली आहे. त्यामुळे आधी सुरू असलेल्या काही मालिका बंद होणार असल्याचं म्हटलं जात आहे. तेव्हा ही नवी मालिका कोणत्या वेळेत दिसणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
‘घरवाली’ आणि ‘बाहरवाली’च्या वादात अडकला रितेश देशमुख! पाहा जेनेलिया-फराहसोबतचा डान्स VIDEOदरम्यान काही वेळापूर्वी आणखी एक मालिका ‘मन झालं बाजिंद’ (Mann Zal Bajind) या मालिकेचाही प्रोमो प्रदर्शित करण्यात आला. ती मालिका देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय ‘ती परत आलीये’ (Ti Parat Aliye) ही मालिका देखील लवकरच सुरू होणार आहे.
Big Boss15: या अभिनेत्रींची लागली बिग बॉसच्या घरात वर्णी; हॉटनेसचा लागणार तडकाश्रेयस च्या मराठीतील कमबॅक मुळे त्याचे लाखो मराठी चाहते फारच उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहेत. अनेकांनी श्रेयसच स्वागत केलं आहे. अभिनेता अंकुश चौधरीनेही (Ankush Chaudhari) कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.