मुंबई 28 जुलै: बॉलिवूडचं पॉवर (Bollywood power couple) कपल म्हणून ओळखली जाणारी जोडी अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि पत्नी अभिनेत्री जेनेलिया डिसोजा देशमुख (Genelia Deshmukh) नेहमीच चर्चेत असतात. सोशल मीडियावर नेहमीच त्यांचे भन्नाट व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात. तर यावेळी त्यांनी दिग्दर्शक फराह खानने (Farah Khan kunder) सोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ते तिघेही धमाल करताना दिसत आहेत.
रितेश, जेनेलिया आणि फराह ‘घरवाली बाहरवाली’ (Gharwali baharwali) या गाण्यावर नृत्य केलं आहे. तसेच मजेशीर व्हिडिओ देखील बनवला आहे. ते शेवटी फराह आणि जेनेलिया निघून जातात. त्यामुळे रितेश एकटाच राहतो.
लाल कमाल म्हणत साराने शेअर केले Photos; पाहताच चाहते म्हणाले 'रेड अलर्ट'
View this post on Instagram
दरम्यान फराह खान सध्या एका नवा कॉमेडी शो घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ज्यात अनेक टीव्ही कलाकार झळकणार आहेत. झी टीव्हीवर (Zee Tv) हा शो प्रसारित होणार आहे. नुकतीच फराहने झी मराठी (Zee Marathi) वरील ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) कार्यक्रमातही हजेरी लावली होती. तिच्यासोबत तिची संपूर्ण टीम देखील उपस्थित होती.
View this post on Instagram
कॉमेडियन डॉक्टर संकेत भोसले, सुगंधा मिश्रा, तेजस्वी प्रकाश, अली असगर, फराह खान, पूनित पाठक हे सगळे या शो मध्ये दिसणार आहेत. झी कॉमेडी नाईटस असं या शोच नाव आहे.
दरम्यान जेनेलिया आणि रितेश देखील या शो मध्ये गेस्ट म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यावेळी त्यांनी फराह सोबत मस्ती केली. फराह आणि रितेश फार जुने मित्र आहेत. त्यांची ही कॉमेडी केमिस्ट्री प्रेक्षकांना फारच आवडते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.