मुंबई, 28 मार्च: होळी (Holi 2022) हा रंगाचा सण आहे. यादिवशी आपापल्या नातलगांसह, मित्रांसह रंगांची उधळण केली जाते. मात्र अनेकदा अनेकांना याचा विसर पडतो की, मुके प्राणी हा रंग सहन करू शकत नाही. त्यांच्या जीवासाठी ही बाब हानिकारक आहे. तरी देखील मुक्या प्राण्यांना अनेकदा होळीच्या रंगीबेरंगी दिवशी भयंकर प्रकारांचा सामना करावा लागतो. अनेकदा असे व्हिडीओ समोर येतात की मुक्या प्राण्याना जबरदस्तीने रंग लावला गेला आहे, त्यांच्यावर रंगाचं पाणी ओतलं आहे. याहीवर्षी देखील असा प्रकार घडला. यंदाच्या होळीनंतरही एका श्वानाचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Dog Viral Video) होत होता. यात एक व्यक्ती एका कुत्र्यावर जबरदस्तीने रंग फेकत आहे, हा व्हिडीओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता. हा संतापजनक प्रकार घडल्यानंतर याबाबत एक सकारात्मक अपडेट समोर आले आहे. अभिनेत्री शिबानी दांडेकर हिने या कुत्र्याची सुटका केली आहे. हे वाचा- ‘तोंडावर पडशील…’ प्राजक्ता माळीचा योगा पाहून चाहत्याने केली अशी काही कमेंट दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला होता. अनेक प्राणी प्रेमींनी WhatsApp, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर करत घडल्या प्रकाराचा निषेध व्यक्त केला होता. अशी माहिती समोर आली आहे की हा व्हिडीओ देहरादूनमधील आहे. हा व्हिडीओ शिबानी दांडेकरने हिने पाहिल्यानंतर तिने बचाव पथकाला टॅग केले होते आणि त्यांची मदत मागितली होती.
या व्हायरल व्हिडीओतील कुत्र्याची सूटका अभिनेत्री शिबानी दांडेकर हिने केली आहे. तिने सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे. या व्हिडीओतील श्वानाचं नाव रॉक्सी असून तिला आता नवीन घर देखील मिळालं आहे. होळीच्या दिवशी ‘रॉक्सी’वर बळजबरीने गुलाल-रंग फेकण्यात आले होते, त्यामुळे ती दिवसभर भूंकत होती. दरम्यान शिबानी दांडेकर आणि तिची बहीण अनुषा दांडेकर यांच्या इन्स्टा पोस्टनुसार तिला आता एका चांगल्या घरामध्ये सुपूर्द करण्यात आले आहे. हे वाचा- या अभिनेत्याने सुरू केला व्यवसाय, आंबे विकायला केली सुरूवात शनिवार, 26 मार्च रोजी, शिबानीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर व्हिडीओ शेअर केला होता आणि लिहिले होती की, ‘रॉक्सी आठवते का जिला एका आठवड्यापूर्वी किती वाईट वागणूक दिली गेली होती?’ ती पुढे म्हणाली, ‘पुढील स्टोरीसाठी स्वाइप करा’. पुढील स्टोरीमध्ये दोन व्यक्तींसह रॉक्सीचा कारमधील फोटो तिने शेअर केला होता, त्यावर अभिनेत्रीने लिहिले होते की, ‘आम्ही रॉक्सीला वाचवण्यात यशस्वी झालो आणि ती एका चांगल्या नवीन घरामध्ये जात आहे’. शिबानीने रॉक्सीचा एक क्लोजअप फोटो देखील शेअर केला, ज्यामध्ये तिने रॉक्सीला वाचवण्यात मदत केल्याबद्दल दोघांचे आभार मानले होते. सेलिब्रिटी फोटोग्राफर Viral Bhayani यांनी या प्रकाराविषयी शेअर केलेली पोस्ट-
शिबानीच्या या कामाचं सोशल मीडियावर विशेष कौतुक केलं जात आहे. अशा लोकांची समाजाला गरज असल्याची प्रतिक्रिया अनेकजण या पोस्टवर करत आहे. शिबानीची बहिण अनुषा दांडेकर हिने ‘ही हॅप्पी एंडिंग’ असल्याचे म्हटले आहे.