मुंबई, 28 मार्च- अभिनेत्री प्राजक्ता माळी ( Prajaktta Mali ) सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिचे व्हिडिओ तसेच फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. प्राजक्ता तिच्या फिटनेसकडे नेहमी लक्ष देताना दिसते. यासाठी ती योगासन करताना दिसते. अनेकदा याचे व्हिडिओ देखील तिनं शेअर केले आहेत. आता खूप दिवसानंतर प्राजक्ताने तिचा योगासनाचा ( Prajaktta Mali latest Video ) एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांकडून भन्नाट कमेंट येत आहेत. प्राजक्ता माळीनं तिचा योगासनाचा व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की, बॅक टू मॅट….परत योगा असं म्हणत तिनं योगासनाचे नाव –काकासन अशी कॅप्शन देखील दिली आहे. ती अगदी शांतपणे योगा करताना दिसत आहे. तिचा योगा पाहून चाहत्यांना देखील प्रेरणा मिळत आहे. कमेंट करत अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. वाचा- ‘तू तेव्हा तशी’ फेम चंदू चिमणे आहे तरी कोण..अभिनयासाठी सोडली बॅंकेची नोकरी प्राजक्ताचा हा व्हिडिओ पाहून एका नेटकऱ्याने म्हटलं आहे की, खुप छान प्राजू…so hard 😍👏🔥🙌❤️तर दुसऱ्याने म्हटलं आहे की, वा वा प्राजू खूप छान एवढ्या दिवसाच्या गॅप नंतर पण तू खूप मस्त केलस❤️♥️💞💓💗💖💝💘❣️ तर आणखी एकानं म्हटलं आहे की, पूर्ण व्हिडिओ बनवून टाका आम्हाला पण प्रयत्न करून पाहायला ❤️❤️❤️ अशा अनेक कमेंट आल्या आहेत. पण प्राजक्ताच्या या व्हिडिओवर काही गमतीदार कमेंट देखील आल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे की, तोंडावर पडशील…हास्य जत्रा अपुरी राहून जाईल 😀😀😀😀😀 तर दुसरी म्हणजे ..फरसाण वाल्या काकू 😂😂😂😂 पण काहीही असलं तरी प्राजक्ताचा हा व्हिडिओ मात्र चाहत्यांना आवडलेला आहे.
प्राजक्ता माळी सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कॉमेडी शो होस्ट करताना दिसते. अनेकदा शोमधील कलाकार प्राजक्ताची सेटजवर फिरकी घेताना दिसतात. प्राजक्ता देखील कलाकारांना तिच्या स्टाईलमध्ये उत्तर देताना दिसते. नुकतीच तिनं आईसोबत परदेश वारी केली.याचे फोटो देखील प्राजक्ताने सोशल मीडियावर शेअर केले होते.