मुंबई, 28 मार्च- अभिनयासोबत अनेक कलाकरा वेगळ्या क्षेत्रात नशीब आजमावताना दिसतात. अनेक कलाकारांचे व्यवसाय देखील आहेत. हिंदीतील हा ट्रेंड आता मराठीत देखील आला आहे. अभिज्ञा भावे तसेच तेजस्वीनी पंडित यांचा तेजाज्ञा हा कपड्याचा ब्रॅंड आहे. याशिवाय निवेदिता सराफ यांचा साड्यांचा व्यावसाय आहे. तर प्रिया बेर्डे यांचा हॉटेलिंगचा व्यवसाय आहे. या पंक्तीत मराठीतील एक लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने आंबे विकायचा ( mango business ) व्यवसाय सुरू केला आहे. जोशी आंबेवाला असं म्हणत त्याने (vighnesh joshi ) त्याच्या व्यवसायाला सुरूवात केली आहे. सोशल मीडिया पोस्ट करत त्याने याबद्दल माहिती देखील दिली आहे. या अभिनेत्याचे नाव विघ्नेश जोशी आहे. विघ्नेश एक उत्तम अभिनेता आहेच शिवाय त्याला एक चांगला हार्मोनियम वादक व गायक म्हणून देखील सर्वजण ओळखतात. फेसबुक पोस्ट करत त्याने आंबे विक्रीबद्दल माहिती दिली आहे. त्यानं म्हटलं आहे की, नमस्कार आजपासून जोशी आंबेवाले दुकान सुरू झाले. शिवाय त्यानं या पोस्टमध्ये दुकानाचा पत्ता विष्णुनगर नौपाडा, ठाणे…अशी देखील माहिती दिली आहे. वाचा- ‘तू तेव्हा तशी’ फेम चंदू चिमणे आहे तरी कोण..अभिनयासाठी सोडली बॅंकेची नोकरी दोन वर्षापूर्वी आलेल्या कोरोना संकटाने मनोरंजनविश्व जिथल्या-तिथे थांबले. विघ्नेशने तेव्हा आंबा विक्रीचा विचार केला आणि रत्नागिरीतील हापूस आंब्यांचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षी छोटय़ा प्रमाणात असलेल्या या व्यवसायाला यंदा विघ्नेशने मोठे स्वरूप दिले आहे.
कोरोनाचा फटका मनोरंजन विश्वाला मोठ्याप्रमाणात बसला. काहींनी मिळेल ते काम केले. यावेळी अनेक कलाकार व्यवसायाकडे वळले. आता अनेक कलाकार जोड व्यवसाय करताना दिसतात.