JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / सिद्धार्थ शुक्लाला आजही मिस करते शहनाज गिल ; शिल्पा शेट्टीच्या शोमध्ये म्हणाली...

सिद्धार्थ शुक्लाला आजही मिस करते शहनाज गिल ; शिल्पा शेट्टीच्या शोमध्ये म्हणाली...

सिद्धार्थ शुक्ला जरी या जगात नसला तरी शहनाजच्या आठवणीत तो आजही आहे. शिल्पा शेट्टीच्या शोमध्ये शहनाज सिद्धार्थविषयी सांगताना दिसली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 6 मार्च-बिग बॉस 13 (Bigg Boss 13) नंतर शहनाज गिलने(Shehnaaz Gill) एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) आणि शहनाज यांच्या जोडीवर प्रेक्षक आजही भरभरून प्रेम करताना दिसतात. या दोघांच्यातील प्रत्येक गोष्ट मग ते भांडण असेल किंवा मस्ती प्रेक्षकांनी खूप भावते. सिद्धार्थ जरी या जगात नसला तरी शहनाजच्या आठवणीत तो आजही आहे. शहनाज लवकरत शिल्पा शेट्टीचा**(Shilpa Shetty Kundra)** शो ‘शेप ऑफ यू’ **(Shape of You)**मध्ये दिसणार आहे. या शोमध्ये ती पुन्हा सिद्धार्थच्या आठवणीत रमताना दिसणार आहे. या शोमध्ये शहनाजसोबत प्रसिद्द रॅपर बादशाह देखील दिसणार आहे. सिद्धार्थला मिस करते शहनाज शिल्पा शेट्टीचा शो ‘शेप ऑफ यू’चा (Shape of You) एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शहनाज गिल (Shehnaaz Gill) सिद्धार्थ शुक्लाला (Sidharth Shukla) मिस करतान दिसत आहे. बोलताना ती सिद्धार्थ शुक्लाबद्दल सांगताना दिसत आहे. ती सिद्धार्थला किती मिस करते हे यातून दिसत आहे.

संबंधित बातम्या

शिल्पाच्या या शोचा नुकताच एक ट्रेलर समोर आला आहे. यामध्ये शहनाज तिचा डान्स दाखवताना दिसत आहे. तिच्या डान्समधून ती तिची फिगर फ्लॉन्ट कशी करायची हे सांगताना दिसत आहे. ती म्हणाताना दिसत आहे की, ठुमके म्हणजे लटके-झटके नाही मारले तर ती फिगर काय कामची? वाचा- पहिल्या kiss चा अनुभव कसा होता? गिरिजा ओकनं शेअर केला किसचा किस्सा सिद्धार्थला काय आवडायचं याबद्दल सांगताना दिसली शहनाज शोमध्ये शिल्पा आणि शहनाज मानसिक आरोग्याबद्दल बोलताना दिसत आहेत. ट्रेलरमध्ये शहनाज सांगताना दिसत आहे की, मला नेहमी हासताना पाहणं सिद्धार्थला आवडायचे. वाचा- फॅन्सनं अभिषेककडे केली ऐश्वर्याविरोधात तक्रार, काय आहे नेमकं प्रकरण? चाहते करत आहेत कमेंट शहनाजचा हा व्हिडिओ पाहून चाहत्यांना हा भाग पाहण्याची उत्सुकता लागली आङे. एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं आहे की, शहनाज गिलच्या या भागाची मी वाट पाहत आहो. तर आणखी एकाने म्हटलं आहे की, शहनाज तू नेहमी आनंदात राहा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या