मुंबई, 5 मार्च- मराठीमोळी अभिनेत्री गिरिजा ओक-गोडबोले (Girija Oak Godbole) ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती तिचे काही फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. गिरिजाने ‘शोर इन द सिटी’ या हिंदी चित्रपटातील किसिंग सीन दिला होता. तिच्या या किसिंग सीनची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. गिरिजाने नुकताच तिच्या पहिल्या किसिंग सीनचा (Girija Oak Godbole First Kiss Experience) अनुभव एका मुलाखतीत शेअर केला आहे. गिरिजाने नुकतीच मिर्ची मराठीला एक मुलाखत दिली. यावेळी तिनं अनेक प्रश्नावर दिलखुलास उत्तरे दिली. यावेळी तिला पहिल्या किसिंग सीनबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा गिरीजा म्हणाली की, मला पहिल्या किसबद्दल फारसं काही आठवत नाही आहे . पण मी एवढं नक्की सांगू शकते की, पहिल्या किसमुळे मला फार छान वाटलं नव्हतं. पहिला किस ही संकल्पनाच मला ओव्हररेटेड असल्यासारखी वाटते. कदाचित पहिल्या किसच्या वेळी मी लहान होते. अगदी कॉलेजमध्ये होते त्यामुळे मला तसं वाटलं असावं, असं तिनं यावेळी सांगितलं. वाचा- अभिनेत्रीने पहिल्यांदाच शेअर केला बाळाचा क्युट फोटो, म्हणाली.. तसेच ती पुढे म्हणाली की, मला एक गोष्ट नंतर जाणवली की पहिल्या किसचा माझा अनुभव खूप वेगळा आणि अविस्मरणीय असू शकला असता. पहिल्या किसच्या वेळी पाऊस पडणं किंवा आम्ही दोघे जवळ येणं असं फार काही रोमँटिक घडलं नाही. त्यामुळे मला तसं वाटलं असावं, असंही तिंन यावेळी सांगितलं.
गिरिजाने वयाच्या 15 व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. गिरिजा अनेक प्रसिद्ध हिंदी आणि मराठी सिनेमात झळकली आहे.‘लज्जा’ ही मराठी मालिका तसेच ‘लेडीज स्पेशल’ या हिंदी मालिकेत गिरिजाने साकारलेल्या भूमिकेला विशेष पसंती मिळाली होती. छोटा पडदाच नाही तर मराठी सिनेमांप्रमाणे हिंदी सिनेमातही तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. आमिर खानसोबत ‘तारे जमीन पर’ सिनेमातही ती झळकली आहे. जाहिराती, मालिका, सिनेमा, नाटक यानंतर गिरीजा शॉर्टफिल्मच्या माध्यमातून रसिकांचे मनोरंजन करत असते.गिरिजा नुकतीच आल्ट बालाजीच्या कार्टेल या वेब सिरिजमध्ये दिसली होती.