JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 28 वर्षांपूर्वी शेफाली शाह कशी दिसायची? व्हायरल झालं जुने Photo

28 वर्षांपूर्वी शेफाली शाह कशी दिसायची? व्हायरल झालं जुने Photo

हे फोटोशूट तिनं एअरहोस्टेस होण्यासाठी केलं होतं. परंतु तिला त्या क्षेत्रात रिजेक्शन मिळालं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 5 जुलै**:** शेफाली शाह (Shefali Shah) सध्या बॉलिवूडमधील सर्वात व्यस्त अभिनेत्रींपैकी एक म्हणून चर्चेत आहे. ‘रंगीला’, ‘सत्या’, ‘महोबत्तें’ यांसारख्य़ा कित्येक सुपरहिट चित्रपटांमध्ये झळकलेल्या शेफालीला आज जवळपास चाळीशीनंतर खरं स्टारडम मिळत आहे. दरम्यान तिने एक 28 वर्ष जुना फोटो पोस्ट करुन सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं. (Shefali Shah throwback photo) हे फोटोशूट तिनं एअरहोस्टेस होण्यासाठी केलं होतं. परंतु तिला त्या क्षेत्रात रिजेक्शन मिळालं. ही आठवण तिनं या फोटोद्वारे आपल्या चाहत्यांना सांगितली आहे. शेफाली गेली दोन दशकं बॉलिवूडमध्ये काम करतेय. तिनं सहाय्यक अभिनेत्री पासून खलनायिकेपर्यंत विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. तिच्या कामाची पाश्चात्य समिक्षकांनी देखील नोंद घेतली आहे. डेल्ही क्राईम ही शैफालीची पहिलीच वेब सीरिज होती. यामध्ये तिनं DCP वर्तीका चर्तुवेदी ही व्यक्तिरेखा साकारली. तिची ही भूमिका तुफान गाजली. अन् या व्यक्तिरेखेमुळे ती खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आली. राजेश साप्ते आत्महत्या प्रकरणी आणखी एकाला अटक; व्हिडीओत नाव घेतलेला नरेश मिस्री सापडला

संबंधित बातम्या

हिना खाननं केली आमिरच्या घटस्फोटाची स्तुती; म्हणाली, ‘नाटक संपलं की…’ या वेब सीरिजमुळं तिला पंख मिळाले. तिनं आजवर जी काही मेहनत, संघर्ष केला होता. त्याचं फळ म्हणूनच तिला ही सीरिज मिळाली. असा अनुभव तिनं पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितला होता. डेल्ही क्राईमच्या यशानंतर शेफालीकडे सध्या कामच काम येऊ लागलं आहे. तिला आता दिवसाला किमान दोन ते तीन फोन येतात. नव्या स्क्रिप्ट सतत घरी येऊ लागल्या आहेत. या सीरिजनंतर तिनं आठ वेगवेगळ्या सीरिजमध्ये काम केलं अन् तिच्या या आठही सीरिज गाजल्या. परिणामी शेफाली सध्या OTT वरील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या