Home /News /entertainment /

हिना खाननं केली आमिरच्या घटस्फोटाची स्तुती; म्हणाली, ‘नाटक संपलं की...’

हिना खाननं केली आमिरच्या घटस्फोटाची स्तुती; म्हणाली, ‘नाटक संपलं की...’

अभिनेत्री हिना खान (Hina Khan) हिने दिलेली प्रतिक्रिया सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. तिनं दोघांचंही कौतुक केलं आहे.

    मुंबई 5 जुलै: आमिर खान (Aamir Khan) आणि किरण राव (Kiran Rao) यांच्याकडे बॉलिवूडमधील सर्वात परफेक्ट कपल म्हणून पाहिलं जात होतं. आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर आमिरनं जवळपास 15 वर्ष किरणसोबत संसार केला. परंतु हा 15 वर्षांचा प्रवास अखेर थांबला. कारण त्यांनी घटस्फोट घेतला आहे. (Aamir khan kiran rao divorce) आमिर आणि किरण यांनी एक जॉइंट स्टेटमेंट जारी करत ही धक्कादायक माहिती आपल्या चाहत्यांना दिली. घटस्फोटाची बातमी समोर येताच अनेकांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या. काहींनी टीका दोघांवर टीका केली तर काहींनी आश्चर्य व्यक्त केलं. परंतु यामध्ये अभिनेत्री हिना खान (Hina Khan) हिने दिलेली प्रतिक्रिया सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. तिनं दोघांचंही कौतुक केलं आहे. काय म्हणाली हिना खान? “किरण आणि आमिर या दोघांचाही मी सन्मान करते. त्यांनी घेतलेला निर्णय गोग्य की अयोग्य हे त्यांनाच अधीक ठावूक आहे. परंतु ज्या पद्धतीने त्यांनी हे प्रकरण हाताळलं ते नक्कची कौतुक करण्याजोगं आहे. सर्वोत्कृष्ट होण्यासाठी तुम्हाला वाईट काळातून जावं लागतं. जेव्हा नाटक संपतं तेव्हा परिपक्वता सुरू होते.” अशा आशयाची इन्स्टाग्राम पोस्ट करत हिनाने आमिर-किरणचे कौतुक केले. गुलाम अलीनं का बदललं आपलं नाव? जाणून घ्या त्यामागचा भन्नाट किस्सा ‘रंग दे बसंतीमध्ये करायचं होतं काम, पण...’; फरहान अख्तरनं का दिला नकार? आमिर आणि किरण यांनी एक जॉइंट स्टेटमेंट (Joint Statement issued by Aamir Khan and Kiran Rao) जारी करत त्यांच्या घटस्फोटाविषयी माहिती दिली आहे. आमिर-किरणचा 15 वर्षांचा संसार मोडल्याने चाहत्यांनी देखील आश्चर्य व्यक्त केलं आहे. त्यांनी जारी केलेल्या स्टेटमेंटमध्ये असं म्हटलं आहे की, ' या 15 वर्षा सुंदर वर्षात आम्ही एकत्र जीवनभरातील अनुभव, आनंद आणि हास्य शेअर केलं  आहे आणि आमचं नातं केवळ विश्वास, सन्मान आणि प्रेमामुळं वृद्धिंगत झालं आहे. आम्हाला आयुष्यात नवीन अध्यायाची सुरुवात करायची आहे- आता नवरा बायको म्हणून नाही तर सह-पालक आणि एकमेकांचं कुटुंब म्हणून'.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Aamir khan, Divorce, Entertainment, Hina khan, Relationship

    पुढील बातम्या