Home /News /entertainment /

राजेश साप्ते आत्महत्या प्रकरणी आणखी एकाला अटक; व्हिडीओत नाव घेतलेला नरेश मिस्री सापडला

राजेश साप्ते आत्महत्या प्रकरणी आणखी एकाला अटक; व्हिडीओत नाव घेतलेला नरेश मिस्री सापडला

नरेशला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सध्या पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.

    मुंबई 5 जुलै: प्रसिद्ध मराठी कला दिग्दर्शक राजेश साप्ते (Raju Sapte Suicide) आत्महत्या प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या आरोपीचं नाव नरेश मिस्त्री असं आहे. (Naresh Mistry arrested) त्याने राजेश यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं होतं असा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी राजेश यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये त्यांनी नरेशचं देखील नाव घेतलं होतं. तो त्यांना बऱ्याच काळापासून धमक्या देत होता असा आरोप त्यांनी केला. परिणामी नरेशला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सध्या पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. ‘रंग दे बसंतीमध्ये करायचं होतं काम, पण...’; फरहान अख्तरनं का दिला नकार? राजेश साप्ते यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. लक्षवेधी बाब म्हणजे आत्महत्येपूर्वी त्यांनी एक सुसाईड नोट आणि एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. त्यातूनच काही व्यक्ती त्यांना त्रास देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण पाच आरोपींनी कट रचून राजेश साप्ते यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच, लेबरला कामावर येऊ देणार नाही. शिवाय व्यवसायिक नुकसान करण्याची ही धमकी देखील देण्यात आली होती. राजेश यांना दहा लाख रुपये आणि प्रत्येक प्रोजेक्टमागे एक लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आली होती. राजेश यांना अडीच लाख रुपये देण्यास भागही पाडलं होतं, असं मयत राजेश यांच्या पत्नी सोनाली सापते यांनी फिर्यादीत म्हटलेलं आहे. हिना खाननं केली आमिरच्या घटस्फोटाची स्तुती; म्हणाली, ‘नाटक संपलं की...’ पाच आरोपींपैकी चंदन रामकृष्ण ठाकरे याने विश्वासघात करून वेळोवेळी फसवणूक केली असल्याचं त्यांच्या पत्नीनं म्हटलं आहे. पाचही आरोपींच्या जाचाला कंटाळून राजेश साप्ते यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांना मानसिक आणि आर्थिक त्रास देण्यात आल्याचं सोनाली यांनी फिर्यादीत म्हटलं आहे. दरम्यान, फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. नरेश विश्वकर्मा (मिस्त्री) , गंगेश्वर श्रीवास्तव (संजुभाई), राकेश मौर्य, चंदन रामकृष्ण ठाकरे आणि अशोक दुबे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावं असून, चंदन रामकृष्ण ठाकरे याला अटक करण्यात आली आहे.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Crime, Entertainment, Suicide case

    पुढील बातम्या