JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Sharmaji Namkeen Trailer Out: एकाच सिनेमात एकच भूमिका साकारणार 2 कलाकार, ऋषी कपूर यांच्या शेवटच्या मुव्हीचा ट्रेलर आउट

Sharmaji Namkeen Trailer Out: एकाच सिनेमात एकच भूमिका साकारणार 2 कलाकार, ऋषी कपूर यांच्या शेवटच्या मुव्हीचा ट्रेलर आउट

Sharmaji Namkeen Trailer Out: हा सिनेमा ऋषी कपूर यांचा शेवटचा सिनेमा आहे म्हणून खास आहेच, शिवाय या सिनेमात एकच पात्र दोन कलाकार सादर करताना दिसणार आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 मार्च: ‘शर्माजी नमकीन’ (Sharmaji Namkeen) या ऋषी कपूर यांच्या शेवटच्या सिनेमाची प्रतीक्षा सर्वांनाच आहे. दरम्यान या सिनेमाचा ट्रेलर आज 17 मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा ऋषी कपूर यांचा शेवटचा सिनेमा आहे म्हणून खास आहेच, शिवाय या सिनेमात एकच पात्र दोन कलाकार सादर करताना दिसणार आहेत. ऋषी कपूर (Rishi Kapoor last movie) यांचं दोन वर्षांपूर्वी निधन झालं. मात्र तोपर्यंत ते चित्रपटात कार्यरत होते. मृत्यूपूर्वी ते ‘शर्माजी नमकीन’ या चित्रपटाचं शूटिंग करत होते, मात्र या दरम्यानच शूटिंग सुरू असतानाच ऋषी कपूर यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यामुळे या चित्रपटातील त्यांची व्यक्तिरेखा अपूर्ण राहिली होती. त्यांनी या सिनेमाचं अधिकांश शूटिंग पूर्ण केलं होतं, मात्र अपूर्ण राहिलेलं काम अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) यांनी पूर्ण केलं आहे. त्यामुळे आता दोन कलाकार एकच भूमिका साकारणाऱ्या या सिनेमाचा ट्रेलर (Sharmaji Namkeen Traiker Out) आज प्रदर्शित झाला आहे. अभिनेता ऋषी कपूर यांचा मुलगा अभिनेता रणबीर कपूर याच्या भाषेत सांगायचं झालं तर अशाप्रकारे दोन कलाकारांनी एकाच सिनेमात दोन भूमिका साकारणं फार दुर्मीळ आहे. अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ (Sharmaji Namkeen on Amazon Prime Video) या ओटीटी प्लॅटफॉर्मने या सिनेमाचा ट्रेलर रीलिज केला आहे. या कौटुंबिक चित्रपटाचं दिग्दर्शन हितेश भाटिया यांनी केलं आहे तर मॅकगफिन पिक्चर्सच्या सहकार्याने एक्सेल एंटरटेनमेंटने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात जुही चावला, सुहेल नय्यर, तारुक रैना, सतीश कौशिक, शिबा चढ्ढा आणि ईशा तलवार यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हे वाचा- ‘ना गोड ना तिखट’, सई-ललितची ‘मीडियम Spicy’ केमिस्ट्री या दिवशी येणार भेटीला या सिनेमाचा विषय तसा रंजक आहे. सिनेमाच्या ट्रेलरवरुन हे लक्षात येते की ही कहाणी निवृत्त झालेल्या एका विधूर पुरुषाची आहे. निवृत्तीनंतरच्या काळात ते स्वत:ला व्यग्र ठेवण्यासाठी काहीतरी छोटंमोठं काम करत असतात. त्यावेळी या शर्माजींना त्यांची कला गवसते. महिलांच्या एका किटी पार्टीला पोहोचल्यानंतर त्यांना लक्षात येतं की ते वेगवेगळे पदार्थ बनवण्यात एक्सपर्ट आहेत. मग हाच छंद शर्माजी या वयात जोपासू लागतात. यावेळी कौटुंबिक नात्यांचा हळूपारपणे उलगडा करण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे.

हितेश भाटिया दिग्दर्शित आणि मॅकगफिन पिक्चर्सचे हनी त्रेहान आणि अभिषेक चौबे यांच्या संयुक्त विद्यमाने एक्सेल एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली रितेश सिधवानी-फरहान अख्तर द्वारे निर्मित, ‘शर्माजी नमकीन’ 31 मार्च रोजी प्राइम व्हिडिओवर जगभरातील 240 देशांमध्ये आणि क्षेत्रांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या