जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Sharmaji Namkeen: अपूर्ण राहिलेल्या सिनेमात ऋषी कपूर यांच्या जागी भूमिका करणार होता रणबीर पण... अभिनेत्याने व्यक्त केली खंत; पाहा VIDEO

Sharmaji Namkeen: अपूर्ण राहिलेल्या सिनेमात ऋषी कपूर यांच्या जागी भूमिका करणार होता रणबीर पण... अभिनेत्याने व्यक्त केली खंत; पाहा VIDEO

Sharmaji Namkeen: अपूर्ण राहिलेल्या सिनेमात ऋषी कपूर यांच्या जागी भूमिका करणार होता रणबीर पण... अभिनेत्याने व्यक्त केली खंत; पाहा VIDEO

‘शर्माजी नमकीन’ या चित्रपटातील ऋषी कपूर यांची व्यक्तिरेखा अपूर्ण राहिली होती. त्यांनी या सिनेमाचं अधिकांश शूटिंग पूर्ण केलं होतं, मात्र अपूर्ण राहिलेलं काम अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) यांनी पूर्ण केलं आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 16 मार्च: बॉलिवूडमधील (Bollywood Latest Update) चॉकलेट बॉय म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांचं दोन वर्षांपूर्वी निधन झालं. मात्र तोपर्यंत ते चित्रपटात कार्यरत होते. मृत्यूपूर्वीदेखील ते ‘शर्माजी नमकीन’ या चित्रपटात अभिनय करत होते, मात्र या चित्रपटाचं शूटिंग सुरू असतानाच ऋषी कपूर यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यामुळे या चित्रपटातील त्यांची व्यक्तिरेखा अपूर्ण राहिली होती. त्यांनी या सिनेमाचं अधिकांश शूटिंग पूर्ण केलं होतं, मात्र अपूर्ण राहिलेलं काम अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) यांनी पूर्ण केलं आहे. आता हा चित्रपट पूर्ण झाला असून, 31 मार्च 22 रोजी अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ (Sharmaji Namkeen on Amazon Prime Video) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी ऋषी कपूर यांचा मुलगा अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) पुढे आला आहे. त्याने वडिलांच्या शेवटच्या चित्रपटाची प्रसिद्धी सुरू केली असून, वडिलांचे अपूर्ण काम पूर्ण केल्याबद्दल त्यानं परेश रावल यांचे आभार मानले आहेत. यानिमित्त रणबीर कपूरने आपल्या चाहत्यांसाठी एक हृदयस्पर्शी संदेश दिला आहे. हे वाचा- ‘द कश्मीर फाइल्स या लिंकवर फ्रीमध्ये’, असा SMS आला आहे? बँक खातं होईल रिकामं अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओनं आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर रणबीर कपूरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो ऋषी कपूर आणि ‘शर्माजी नमकीन’ या चित्रपटाबद्दल बोलताना दिसत आहे. यात रणबीर कपूरनं म्हटलं आहे की, ‘ऋषी कपूर यांची तब्येत खराब असूनही त्यांना ‘शर्माजी नमकीन’ हा चित्रपट कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायचा होता, परंतु ते करू शकले नाहीत. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर, चित्रपटाच्या निर्मात्यांनी व्हीएफएक्सचा प्रयत्न केला. तसंच प्रोस्थेटिक्सद्वारे माझा लुक वडिलांसारखा दिसेल, असा प्रयत्न केला; मात्र ते होऊ शकलं नाही.’

    News18

    ‘ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी ऋषी कपूर यांची ही भूमिका पूर्ण केली. यासाठी आपण सदैव त्यांचे ऋणी राहू,’ असं रणबीर कपूर यानं म्हटलं आहे. तो असंही म्हणाला की एक भूमिका एकाच चित्रपटात दोन कलाकारांनी करणं हे फिल्म जगतात तसं दुर्मीळचं आहे.

    जाहिरात

    या व्हिडीओमध्ये रणबीरनं त्याच्या वडिलांच्या एका डायलॉगचा संदर्भ दिला असून, तो म्हणतो की, ‘आपण ‘द शो मस्ट गो ऑन’ हे वाक्य ऐकलं असेल, पण मी पप्पांना त्या वाक्यानुसार त्यांचं आयुष्य जगताना पाहिलं आहे. ‘शर्माजी नमकीन’ हा चित्रपट नेहमीच माझ्या वडिलांच्या लाडक्या आठवणींपैकी एक आठवण राहील. हा असा चित्रपट आहे जो त्यांच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू आणेल.’ यावेळी रणबीर कपूरने आपले वडील ऋषी कपूर यांच्याबद्दल आणखीही काही गोष्टी सांगितल्या. या सिनेमाचा ट्रेलर 17 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. हे वाचा- ‘प्रत्येक फोटोत..‘पोस्ट लिहीत आकाश ठोसरबद्दल काय म्हणाली रिंकू राजगुरु? ‘शर्माजी नमकीन’ हा चित्रपट एका सेवानिवृत्त पुरुषाच्या जीवनावर आधारित आहे. ज्याला धमाल करणाऱ्या महिलांच्या किटी सर्कलमध्ये सामील झाल्यानंतर, आपल्याला स्वयंपाक करण्याची किती आवड आहे हे लक्षात येतं. या चित्रपटाचं दिग्दर्शन हितेश भाटिया यांनी केलं आहे तर मॅकगफिन पिक्चर्सच्या सहकार्याने एक्सेल एंटरटेनमेंटने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात जुही चावला, सुहेल नय्यर, तारुक रैना, सतीश कौशिक, शिबा चढ्ढा आणि ईशा तलवार यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात