मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'ना गोड ना तिखट', सई ताम्हणकर-ललित प्रभाकरची 'मीडियम Spicy' केमिस्ट्री या दिवशी येणार भेटीला

'ना गोड ना तिखट', सई ताम्हणकर-ललित प्रभाकरची 'मीडियम Spicy' केमिस्ट्री या दिवशी येणार भेटीला

सई ताम्हणकरने आपल्या आगामी 'मीडियम स्पाईसी' (Medium Spicy) चित्रपटाची रिलीज डेट शेअर केली आहे.

सई ताम्हणकरने आपल्या आगामी 'मीडियम स्पाईसी' (Medium Spicy) चित्रपटाची रिलीज डेट शेअर केली आहे.

सई ताम्हणकरने आपल्या आगामी 'मीडियम स्पाईसी' (Medium Spicy) चित्रपटाची रिलीज डेट शेअर केली आहे.

  मुंबई, 17 मार्च-   अभिनेत्री सई ताम्हणकर   (Sai Tamhankar)  मराठी मनोरंजन सृष्टीतील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. सई विविध दमदार भूमिका साकारत आपलं अभिनय कौशल्य वारंवार सिद्ध केलं आहे. ती नाटक, मराठी-हिंदी चित्रपट, वेबसीरीज, रिएलिटी शो अशा विविध माध्यमांतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते. याच पार्श्वभूमीवर सई पुन्हा एका नव्या मराठी चित्रपटातून पडद्यावर झळकणार आहे. नुकतंच सई ताम्हणकरने आपल्या आगामी 'मीडियम स्पाईसी'  (Medium Spicy) चित्रपटाची रिलीज डेट शेअर केली आहे. सई ताम्हणकरने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून तिने आपल्या आगामी चित्रपटाची माहिती दिली आहे. अभिनेत्रीने आपल्या आगामी ' मीडियम स्पाईसी' या चित्रपटाचं पोस्टर शेअर करत त्याची रिलीज डेट सांगितली आहे. सोबतच सईने कॅप्शन देत लिहिलं आहे, 'फायनली... तुम्हाला गौरीची भेट घालून देण्यासाठी आणखी प्रतीक्षा नाही करू शकत'. यावरून चित्रपटात सई गौरीच्या रूपात दिसणार हे स्पष्ट झालं आहे. या याचित्रपटाच्या पोस्टरवर सई ताम्हणकरसोबत अभिनेता ललित प्रभाकर  (Lalit Prabhakar)  आणि अभिनेत्री पर्ण पेठेसुद्धा  (Parna Pethe)  आहे.यामध्ये सई ताम्हणकर वेस्टर्न लुकमध्ये दिसत आहे. तर पर्ण ट्रॅडिशनल लुकमध्ये. चित्रपटाच्या पोस्टवर 'ना गोड ना तिखट, बट जस्ट राईट मीडियम स्पाईसी' अशी टॅगलाईन दिलेली आहे. यावरून चित्रपटात तिघांच्या केमिस्ट्रीचा जबरदस्त तडक पाहायला मिळणार असल्याचं दिसून येत आहे.
  'मीडियम स्पाईसी' हा चित्रपट 17 जून 2022 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मोहित टाकळकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर इरावती कर्णिक यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे. विधी कासळीवाल या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. पोस्टर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, Sai tamhankar, Upcoming movie

  पुढील बातम्या