
अभिनेत्री रिंकू राजगुरू नेहमीच निरनिराळ्या कारणांसाठी चर्चेत असते. तिने नुकतच एक नवं फोटोशुट केलं आहे. पाहा तिचे फोटो.

रिंकूचं हे ग्लॅमरस फोटोशुट पाहून तिचे चाहते तिच्यावर फिदा होताना दिसत आहेत.

रिंकूला तिच्या चाहत्यांनी अनेक कमेंट्स दिल्या आहेत. तसेच काही सेलिब्रीटींनीही तिला कमेंट्स दिल्या आहेत.

शाहीद कपूरचा भाऊ इशान खट्टरने रिंकूला कमेंट दिली आहे. त्याने वाइब असं लिहिलं आहे. त्यावर रिंकूनेही हात वर करत कमेंट दिली आहे.

दरम्यान इशानने रिंकूचा पहिला चित्रपट सैराटच्या हिंदी रेिमेकमध्ये धडकमध्ये काम केलं होतं.

रिंकू सध्या फारच चर्चेत आहे. लवकरच तिचा आणखी एक हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

रिंकूने नुकतच तिचं पहिलं फोटोशुट केलं आहे.

तिचा नवा चित्रपट २००ची नुकतीच घोषणा झाली आहे. हा तिचा हिंदी ओटीटी वरील चित्रपट असणार आहे.

रिंकू या चित्रपटात अमोल पालेकर, बरुण सोबती यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे.

याशिवाय रिंकू झुंड या चित्रपटात देखील दिसणार आहे.