JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 15 वर्षांचं करिअर, लग्नाची 5 वर्ष अन् TVअभिनेत्रीनं घेतला करिअर सोडण्याचा निर्णय

15 वर्षांचं करिअर, लग्नाची 5 वर्ष अन् TVअभिनेत्रीनं घेतला करिअर सोडण्याचा निर्णय

‘ससुराल सिमर का’ या प्रसिद्ध मालिकेतील अभिनेत्री दीपिका कक्कडनं अभिनयातील करिअरला फुलस्टाप देण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्री नुकत्यात एक मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

जाहिरात

ससुराल सिमर का फेम अभिनेत्रीनं ठोकला अभिनय करिअरला रामराम

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 मे : टेलिव्हिजनवरील अभिनेत्रींचा मोठा फॅन फॉलोविंग पाहायला मिळतो. पण यातील काहीच अभिनेत्री या पुढे जाऊन आणखी नव्या शोमध्ये दिसतात. तर काही जण एखादी मालिका करून आपल्या करिअरला रामराम ठोकतात. प्रत्येकाची  यामागची कारणं वेगळी असतात. अनेक अभिनेत्री लग्न झाल्यानंतर करिअर सोडत असल्याचं समोर आहे. याच अभिनेत्रींमध्ये आणखी एका अभिनेत्रीचं नाव समोर आलं आहे. ‘ससुराल सिमर का’ या प्रसिद्ध मालिकेतील अभिनेत्री दीपिका कक्कडनं अभिनयातील करिअरला फुलस्टाप देण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्री नुकत्यात एक मुलाखतीत हा खुलासा केला आहे. अभिनेत्री दीपिका कक्कड स्टार प्लसवरील ‘कहा हम कहा तुम’ या मालिकेत शेवटची दिसली होती. 2020मध्ये ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ज्यात ती करण ग्रोवरबरोबर दिसली होती. त्याआधी ती ‘बिग बॉस 12’ मध्ये दिसली होती. त्याचप्रमाणे ‘झलक दिखला जा 8’, तसेच ‘नच बलिए 8’ मध्ये देखील तिनं सहभाग घेतला होता.तिनं 2010मध्ये ‘नीर भरे तरे नैना देवी’ या मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण केलं होतं. जवळपास 13 वर्ष ती टेलिव्हिजन क्षेत्रात काम करतेय. मात्र इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर तिनं अचानक अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. हेही वाचा - IIFA पुरस्कार सोहळ्यात जेनिलिया वहिनीच्या अगळ्या-वेगळ्या साडीची हवा, अभिनेत्रीच्या लुकवर दादा फिदा!

संबंधित बातम्या

‘ससुराल सिमर का’च्या सेटवर दीपिका शोएब इब्राहिमला भेटली. त्यांनी  2018मध्ये लग्न केलं आणि 2023च्या जानेवारी महिन्यात दीपिकाने तिच्या बाळाला जन्म दिला. आमच्या आयुष्यात सर्वात सुंदर क्षण असं म्हणत तिनं आई झाल्याची गुड न्यूज सर्वांना दिली. आई झाल्यानंतर मात्र आता दीपिकानं अभिनय क्षेत्रातून दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

टेली चक्करला दिलेल्या मुलाखतीत दीपिका म्हणाली, “मी प्रेग्नंसीच्या या फेजचा आनंद घेत आहे. मला आता अभिनयातील करिअर सोडायचं आहे. मी माझ्या पहिल्या बाळाबरोबर मजेत राहणार आहे. मी फार कमी वयात काम करण्यास सुरूवात केली होती. जवळपा, 10-15 वर्ष मी सातत्यानं काम करतेय. जशी मी प्रेग्नंट राहिले तसा माझा नवा प्रवास सुरू झाला. तेव्हाच मी शोएबला सांगितलं होतं की, मला काम करायचं नाहीये, मला अभिनयातील करिअर सोडायचं आहे. आता मला एक हाइसवाइफ आणि आईच्या रुपात पुढील आयुष्य घालवायचं आहे”.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या