'आयफा' हा बॉलीवूडमध्ये मानाचा मानला जाणारा पुरस्कार आहे. नुकताच हा पुरस्कार सोहळा यंदाच्या वर्षी अबू दाबी येथे पार पडला. यात माहाराष्ट्राच्या दादा वहिनीनं म्हणजे सर्वांच्या लाडक्या रितेश जिनिलियाने खास हजेरी लावली होती.
यावेळी सगळ्यांच्या नजरा आपल्या महाराष्ट्राच्या लाडक्या वहिनीसाहेबांच्या म्हणजे जिनिलियाच्या साडीवर खिळल्या होत्या.
काळ्या रंगाच्या या साडीत जिनिलिया खूपच सुंदर दिसत होती. सोबत ऑक्सडाईज ज्वेलरी तिच्या लुकमध्ये अधिक भर घालत होती.
‘आयफा’ पुरस्कार सोहळ्यामध्ये ‘वेड’ चित्रपटाला प्रादेशिक चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार मिळाला.चित्रपटाचा दिग्दर्शक रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनिलिया देशमुख म्हणजे आपल्या दादा-वहिनीनं जोडीनं हा पुरस्कार स्वीकारला.( फोटो साभार- जिनिलिया देशमुख इन्स्टाग्राम)